वाई : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी आगामी काळात सक्षमपणे कामकाज पाहण्यासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली असून लवकरच कार्यकारणी निवडण्यात येणार आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे धाकटे बंधू आहेत.

हेही वाचा – “निवडणूक आयोगाचा निर्णय…”, अध्यक्षपदाच्या निवडीवरून अजित पवारांचं विधान

मागील तीस वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निवड सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी केल्याने सताऱ्यासह फलटण शहरात व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, फलटण पंचायत समिती सभापती आदी अनेक पदांवर आणि फलटण शहर व पालिका राजकारणात त्यांनी काम केले आहे.

हेही वाचा – बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढणार? रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार शरामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjivraje naik nimbalkar as district president of ncp ajit pawar group satara ssb