भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. तर पावसाळी अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. अशात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण घटनेबाबत उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज ते विधान भवनात आले होते. तिथे त्यांना किरीट सोमय्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्यांविषयी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“मी असे किळसवाणे आणि बीभत्स व्हिडीओ कधीही बघत नाही.परंतु त्यावर काल जनतेने आणि खास करुन राज्यातल्या माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर सरकारने केली पाहिजे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचा विषय संपवला आहे.

हे पण वाचा- बंगारु लक्ष्मण… संजय जोशी… ते किरीट सोमय्या…; कथित चित्रफीती अन् भाजपनेत्यांची कोंडी

काय आहे प्रकरण?

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवरून विधानपरिषदेतही गोंधळ झाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( ठाकरे ) गट आमदार अनिल परब यांनी याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“राजकारणात अनेकवेळा असे प्रसंग येतात की त्यात माणसाचं पूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. पण, समोर आलेल्या प्रकरणातील काही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी आम्ही करू. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.”

हे पण वाचा- किरीट सोमय्यांच्या व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आक्षेपार्ह…”

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “देवेंद्रजी, एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.”

“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी,” अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

“ही व्हिडीओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडीओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे,” असंही सोमय्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray first reaction on kirit somaiya controversial video scj