बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आज (२७ डिसेंबर) ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. येथे सलमानच्या अशा १० गोष्टींची माहिती दिली आहे, ज्या तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहाः ‘दबंग’ सलमानचा ४८वा वाढदिवस

१. मोठ्या मनाचा अशी ओळख असलेला सलमान वरचेवर रुग्णालयात जाऊन आजारी मुलांची भेट घेतो आणि रक्तदानही करतो.

२. सलमानला लंडन हे शहर खूप आवडते.

३. शाळेच्या दिवसांमध्ये तो एक चांगला स्विमर होता. इतकेच नाही तर त्याला आपल्या देशाचे नेतृत्व करण्याचीही इच्छा होती.

४. तो नव्या टॅलेण्टला संधी देण्यावर विश्वास ठेवतो. शॉट्सच्या मधल्या वेळात नव्या स्क्रीप्ट आणि कल्पना ऐकण्यासाठी तो वेळ देतो.

५. ज्यावेळेस सलमान चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होता त्यावेळी त्याने कधीच आपल्या वडिलांच्या नावाचा वापर केला नाही. तो स्वतः निर्मात्यांना भेटून ऑडिशन देत असे.

६. खूप कमी जणांना माहित आहे की, सलमान हा एक चांगला चित्रकार आहे. त्याची आईसुद्धा चित्रकार आहे.

७. चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीच्या सुरुवातीला १० लाख रुपये कमविणे हे त्याचे लक्ष्य होते.

८. सलमान खानने आतापर्यंत कधीही चुंबनदृश्य दिलेले नाही. असे दृश्य न करण्यासाठी त्याने दोन चित्रपट नाकारलेही आहेत.

९. त्याला फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. या नादाची त्याच्या घरातल्यांना आणि मित्रमंडळींना चांगलीच माहिती आहे.  

१०. सलमानला वेगवेगळ्या साबणांचे वेड असून, खास करून त्याला फळांचा अर्क असणारे साबण फार आवडतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 things you didnt know about virgin salman khan