राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला आहे. अंतिम टप्प्यात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाल्याचे बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद ओक याने नुकतंच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने दोन खास फोटोदेखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओकनं एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. ह फोटो धर्मवीरच्या ट्रेलर लाँचदरम्यानचा आहे. तर दुसरा फोटो हा धर्मवीर चित्रपटातील आहे. यात एकनाथ शिंदे हे एका मंदिरात देवासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. हे दोन्ही फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया, म्हणाली “धन्यवाद उद्धवजी…”

“मा. मुख्यमंत्री…श्री एकनाथजी शिंदे साहेब… मनःपूर्वक अभिनंदन आणि कोटी कोटी शुभेच्छा…!!!”, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोला दिले आहे. त्याचा हा फोटो आणि पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले “नाटक सुरु…”

दरम्यान प्रसाद ओक याने धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तसेच प्रसादच्या भूमिकेसाठी एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा होता. प्रसाद ओक आणि एकनाथ शिंदे यांचे फार चांगले संबंध आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच प्रसाद ओकनं त्यांना शुभेच्छा देत खास फोटो देखील शेअर केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prasad oak congratulates share instagram post after maharashtra new cm eknath shinde nrp
First published on: 01-07-2022 at 08:33 IST