“जर आलिया भट्ट…, ‘रानबाजार’मधील बोल्ड सीनवर प्राजक्ता माळीच्या आईने दिली अशी प्रतिक्रिया

“मी ही वेबसीरीज करते आहे. हे कलाकार म्हणून माझं ठरलं होतं”, असेही तिने सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित पाहायला मिळत आहे. यात त्या दोघींनीही बोल्ड सीन दिले आहे. यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे. नुकतंच प्राजक्ता माळीने या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान प्राजक्ता माळीने या भूमिकेबद्दल बोलताना स्पष्टीकरण दिले. तसेच यावर तिच्या आईची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही तिने सांगितले. यावर ती म्हणाली, “प्रेक्षकांची ही प्रतिक्रिया स्वाभाविक होती. कारण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख होती. हा प्रोजेक्ट स्विकारताना मला माहिती होतं की ते माझ्या चाहत्यांना खटकणार आहे. तो टिझर होता.”

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“त्यात मी कोणती भूमिका करते हे लोकांना समजलं नव्हतं. पण आता त्यांना समजलं आहे की मी कामाठीपुरामधील सेक्स वर्करची भूमिका करत आहे. त्यामुळे टीझर हा वेगळा आहे आणि सीरीज ही वेगळी आहे. तुम्ही सीरीज बघा आणि मग सांगा”, असेही प्राजक्ता म्हणाली.

“या वेबसीरीजचा पहिला एपिसोड वाचून झाल्यानंतर मी पाच मिनिटे टाळ्या वाजवत होते. मला यातली कोणतीही भूमिका द्या, मी ही वेबसीरीज करते आहे. हे कलाकार म्हणून माझं ठरलं होतं”, असेही तिने सांगितले.

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत’तू ही वेबसीरीज स्विकारल्यानंतर तुझ्या आईची प्रतिक्रिया काय होती?’ असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान प्राजक्ताला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “माझी आई माझ्यापेक्षा जास्त बोल्ड आहे. ती माझ्यापेक्षा १० पावलं पुढे आहे. तिची मी परवानगी घेऊन ही वेबसीरीज केली. ती माझी एक कलाकार आणि एक माणूस म्हणून विभागणी करु शकते. कलाकार म्हणून तिचा मला यासाठी पाठिंबा दिला.

“मी ही वेबसीरीज स्विकारण्यापूर्वी आईची रितसर परवानगी घेतली. मी आईला स्पष्ट सांगितलं होतं की मी स्क्रिप्ट ऐकलं आहे, ते फार तगडं आहे. माझी भूमिका अशी अशी आहे. त्यावेळी आई मला म्हणाली आलिया भट्टची कामाठीपुरावर एक चित्रपट येतोय गंगूबाई काठियावाडी. मग आलिया भट्ट जर करु शकते तर तू का नाही? तिने मला खूप पाठिंबा दिला”, असेही प्राजक्ता माळी म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress prajaka mali mother reaction on ranbazar web series bold scene nrp

Next Story
VIDEO : ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची जादू, अभिनेत्रीवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी