कास्टिंग काऊच हा शब्द बी-टाऊनला काही नवीन नाही. आजवर काही अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. मात्र याबाबत काही दिवसांपूरता चर्चा रंगते. कास्टिंग काऊचचा सामना काही सुप्रसिद्ध अभिनेत्रींनाही करावा लागला. आता या विषयावर अभिनेत्री शमा सिकंदरने भाष्य केलं आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्यांनी तिला कशाप्रकारे वागणूक दिली याबाबतचा अनुभव तिने सांगितला आहे.
आणखी वाचा – ‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर राम गोपाल वर्मा यांचं मोठं विधान, म्हणाले, “विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे…”
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शमा कास्टिंग काऊचबाबात बोलत होती. ती म्हणाली, “काही निर्मात्यांनी माझ्याशी चुकीच्या पद्धतीने मैत्री करण्याचा प्रयत्न केला. जर आपण एकत्र कामच करत नाही तर मैत्री कशी करू शकतो असा विचार मी करायचे. सत्य पाहता कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांचा सेक्स हा एकच उद्देश होता.”
बॉलिवूडपुरताच हे मर्यादित नव्हे तर सगळ्याच ठिकाणी अशा वृत्तीचे लोक आहेत असं शमाने यावेळी सांगितलं. शिवाय ती म्हणाली, “कलाक्षेत्रात असेही काही लोक आहेत ज्यांच्यामुळे काम करताना मला सुरक्षित वाटलं. म्हणून संपूर्ण कलाक्षेत्रामध्ये विचित्र लोक आहेत असं बोलता येणार नाही.” शमाने नव्या पिढीतील निर्मात्यांचं कौतुक केलं.
आणखी वाचा – Photos : “फरसाण घेऊन गेलीस का?” लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीला नेटकऱ्यांनी विचारले मजेशीर प्रश्न
नव्या पिढीतील निर्मात्यांची विचार करण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे असं शमाचं म्हणणं आहे. शमाने ‘मन’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तसेच टीव्ही मालिका, वेबसीरिजमध्ये तिने काम केलं आहे. ‘बालवीर’ या मालिकेमध्ये ती सध्या काम करत आहे.