बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर ही लाइमलाइट पासून दूर राहते. तिच्या इतर भावंडांच्या तुलनेत सोशल मीडियावर ती सक्रिय नसते. या सगळ्यात आता अंशुला तिच्या वजनामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंशुलाने तिचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. अंशुलाने राखाडी रंगाचा टॉप परिधान केला आहे. एकेकाळी अंशुला तिच्या भावासारखी म्हणजेच अर्जुनसारखी गोलू-मोलू होती. पण तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन तिचे वडील म्हणजेच बोनू कपूर यांना प्रचंड आवडले आहे. यासोबतच तिच्या या फोटोवर कमेंट्स करत सगळेच तिचे कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : “मी झोपडपट्टीत वाढलोय…”, ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचे वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “२.३० तासात तू दोन महाराजांची…”, प्रवीण तरडे यांच्यासाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट

या आधी अंशुलाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या फिटनेसचे आणि वर्कआउटचे फोटो-व्हिडिओ अनेकदा शेअर केले आहेत. ते पाहिल्यानंतर अंशुला तिच्या फिटनेस आणि लूकवर खूप मेहनत घेत होती हे लक्षात येते. तिच्या या बजललेल्या लूकला पाहता असा अंदाज लावला आहे की कदाचित ती लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अंशुलाचा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला या ट्रान्सफॉर्मेशनचे सिक्रेट विचारले आहे.

आणखी वाचा : करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

अंशुला कपूर ही चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण आहे. पहिली पत्नी मोना हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले, त्या दोघांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर नावाच्या दोन मुली आहेत. दोघांनीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर या चारही भावंडांमध्ये खूप चांगलं बाँडिंग पाहायला मिळतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor sister anshula kapoor stuns fans with her weight loss shares new pic dcp