बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. काल आलियाचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहते, बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच तिने आता वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत मात्र या फोटोत तिने परिधान केलेल्या स्वेटरची सध्या चर्चा जास्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

.आलिया भट्टने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिल्यानंतर आता आलियाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. त्याआधी एप्रिल महिन्यात तिने अभिनेता रणबीर कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. यावर्षी तिने आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची आई, बहीण, पती रणबीर कपूर दिसत आहे. आलियाने जो स्वेटर परिधान केला आहे त्याची किंमत १. ४४ लाख इतकी असल्याचे बोलले जात आहे.

परदेशातही ‘आरआरआर’चा डंका; ‘या’ देशात लवकरच गाठणार १०० कोटींचा पल्ला

सध्या ती भट्ट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचं शूटिंग करत आहे. नुकतंच या चित्रपटाचं शेड्यूल काश्मीरमध्ये पार पडलं. तर लवकरच ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल अशी शक्यता आहे.

आलियाला घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. त्यामुळे तिला लहानपणापासून अभिनयाची आवड लागली. अभिनेत्री व्हायचं हे तिने लहान वयातच ठरवलं होतं. इतकंच नाही तर अभिनेत्री होण्यासाठी तिने तिचं शिक्षणही अर्धवट सोडलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress alia bhatt celebrated 30th birthday wearing 1 44 lakh sweater spg