scorecardresearch

विजय सेतुपतीच्या ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्वपूर्ण भूमिका

या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक मुकपट आहे.

विजय सेतुपतीच्या ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्वपूर्ण भूमिका

साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. अलीकडेच तो बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानसोबत त्याच्या ‘जवान’ या चित्रपटात दिसणार असल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, आता विजयच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या ‘गांधी टॉक्स’ या नव्या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : “प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्याची ताकद आता स्टार्सकडे नाही…”, शत्रुघ्न सिन्हा यांनी मांडले स्पष्ट मत

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांच्या व्यतिरिक्त हिंदीतही त्याने बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केला आहे. आता आणखीन एक पाऊल पुढे टाकत तो दक्षिणात्य सुपारस्टार विजय सेतुपतीबरोबर काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक मुकपट आहे. हा चित्रपट पैशांच्या खेळावर आधारित असल्याचं या टीझरवरुन दिसून येत आहे.

सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ‘गांधी टॉक्स’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलं, “मी फार उत्सूक आहे…माझा पुढील चित्रपट. पुन्हा एकदा मुकपटांचा काळ जगूया. झी स्टुडिओज अभिमानाने सादर करत आहे ‘गांधी टॉक्स’. विजय सेतूपती, अरविंद स्वामी, अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ जाधव स्टारर डार्क कॉमेडी आणि ए. आर. रहमान यांचे म्युझिकल.”

हेही वाचा : अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित

‘गांधी टॉक्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेलेकर यांनी केले आहे. या चित्रपटात विजय सेतूपती, अरविंद स्वामी, आदिती राव हैदरी, सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर या चित्रपटाचे संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. झी स्टुडिओज, क्युरियस डिजिटल आणि मुव्ही मिल एंटरटेनमेंट हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या