९५ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर २०२३ च्या नामांकनांची घोषणा अखेर करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्कर चित्रपटांवर चर्चा सुरु होत्या. ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ हे गाणं आता बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट झालं आहे. ऑस्करच्या शर्यतीत चेला शो आणि द काश्मीर फाइल्स हे चित्रपट होते मात्र या दोन्ही चित्रपटांची निवड झाली नाही. यावर आता द काश्मीर फाईल चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी भाष्य केलं आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अनुपम खेर गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या करियरमध्ये त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. एका मुलाखतीत ते असं म्हणाले, “काश्मीरच्या फाईलची निवड होताना नक्कीच काहीतरी अडचण आली असेल आरआरआर चित्रपटाच्या निवडीवर ते असं म्हणाले, आतापर्यंत (पाश्चात्य प्रेक्षक) जे चित्रपट स्वीकारायचे ते सर्व भारतातील गरिबीवर भाष्य करणारे होते. भारतीय आणि तेलगू चित्रपट मुख्य प्रवाहात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
Photos : फक्त भारती सिंगच नव्हे तर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनीदेखील केले आहे गरोदरपणात शूटिंग
राजामौली दिग्दर्शित दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ची सध्या जागतिक स्तरावर चांगलीच चर्चा आहे. ‘नाटू नाटू’ गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवली आहेत. या गाण्यात चित्रपटातील मुख्य अभिनेते ज्युनियर एनटीआर, राम चरण यांनी धमाकेदार डान्स केला आहे. हे गाणं एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले होते आणि गीत चंद्रबोस यांनी लिहिले होते.
शाहरुख खानच्या ‘पठाण’वर केआरकेचे ‘ते’ ट्वीट; नेटकऱ्यांनी केलं
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी १९२० मधील ब्रिटिशकालीन भारतातील स्वतंत्र सेनानी कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामाराजू यांच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्यासह ब्रिटीश कलाकार रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.