श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून श्रद्धा आणि रणबीर ही फ्रेश जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि प्रेमाकडे बघायचा दृष्टिकोन यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोमॅंटिक कॉमेडी धाटणीच्या या चित्रपटाचं ‘तेरे प्यार में’ हे फ्रेश गाणंसुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं लोकांना चांगलंच आवडलं आहे, शिवाय यात श्रद्धा आणि रणबीरमधील केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे. यामधील श्रद्धाचा बोल्ड अंदाज आणि रणबीरचा डान्सही लोकांच्या पसंतीस पडला आहे. सध्या श्रद्धा आणि रणबीर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’ फेम अमन गुप्ताने पत्नीसाठी केलेला दिल्ली ते पुणे विना तिकीट प्रवास; नेमका किस्सा जाणून घ्या

सुरुवातीचे काही दिवस फक्त श्रद्धा कपूरच या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत होती. आता रणबीर कपूरही काही ठिकाणी प्रमोशनसाठी आल्याने काही लोकांनी त्याला प्रश्न विचारला की, “आलियाने प्रमोशनसाठी जायला मनाई केली होती का?” या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना रणबीरने लगेच उत्तर दिलं. तो म्हणाला, “ती मला कशाला अडवेल. तुम्ही अशाच अफवा पसरवत आहात. असं काहीही घडलेलं नाही, तुम्ही उगाच कॉंट्रोवर्सी निर्माण करत आहात. सध्या माझ्या आयुष्यात काही कॉंट्रोवर्सी नाहीये ते बरंच आहे.”

प्रेक्षकांना ही नवी फ्रेश जोडी मोठ्या पडद्यावर बघताना जास्त मजा यावी यासाठी निर्मात्यांनी या दोघांनी वेगवेगळं प्रमोशन करण्याची शक्कल लढवल्याचं सांगितलं जात आहे. ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चाहते रणबीर आणि श्रद्धा यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याबरोबरच चित्रपटात अनुभव बस्सी, बोनी कपूर, डिंपल कपाडिया,मोनिका चौधरीसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यापाठोपाठ रणबीरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटासाठीही प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia said no to promote tu jhoothi main makkar film with shraddha kapoor ranbir gives answer avn