शाहरुख खान हा जगभरातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या कामाबरोबर असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, त्याच्या राहणीमानामुळे अनेकदा लक्ष वेधून घेत असतो. यापैकीच एक कारण म्हणजे त्याचा ‘मन्नत’ हा बंगला. त्याच्या चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांना देखील या बंगल्याबद्दल खूप अप्रूप आहे. आमिर खान जेव्हा शाहरुख खानच्या या बंगल्यात पहिल्यांदा गेला होता तेव्हाच्या आठवणी त्याने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितल्या होत्या ज्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर खान जेव्हा पहिल्यांदा शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात गेला होता तेव्हा त्याचं ते आलिशान घर आणि शाहरुख खानचा वॉर्डरोब पाहून थक्क झाला होता. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख खानचा वॉर्डरोब कसा आहे आणि त्यांनी कुठल्या गोष्टी कशा ठेवल्या आहेत याचा खुलासा आमिर खानने केला होता.

आणखी वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

आमिर खान म्हणालेला, “मी स्वतःला स्टार मानत नाही, शाहरुख खानला स्टार मानतो. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ग्रँड आहे. मन्नत बंगला जेव्हा नवीन होता तेव्हा मी पहिल्यांदा त्या घरी गेलो होतो. तेव्हा शाहरुख खान मला त्याचा वॉर्डरोब दाखवायला घेऊन गेला. त्याचा वॉर्डरोब माझ्या पूर्ण घराएवढा मोठा आहे. त्यात शाहरुख खानचे कपडे, त्याचे टी-शर्ट व्यवस्थित इस्त्री करून ठेवण्यात आले आहेत. त्याचे ब्लेझर, सुट, शूज मोजे हे सगळंही व्यवस्थित जागी ठेवलेलं आहे. ते पाहून माझ्या तोंडून, ‘वाह!! असं असतं स्टारचं घर’ असेच उद्गार निघाले होते.”

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याला लागली नवी ‘डायमंड’ नेमप्लेट, फोटो व्हायरल

त्यावेळी आमिर खानने जरी शाहरुख खानचं कौतुक केलं असलं तरीही काही वर्षांपूर्वी त्यांच्यात बरेच मतभेद झाले होते. ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. पण त्यानंतर २०१७ च्या एका दिवाळी पार्टीला हे दोघे एकत्र दिसून आले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amir khan revealed how is shahrukh khan bungalow mannat from inside rnv