Amitabh Bachchan Brother Ajitabh Relation: अमिताभ बच्चन हे लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चे (Kaun Banega Crorepati 16) होस्ट आहेत. सध्या या शोचा १६ वा सीझन सुरू आहे. या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांशी बिग बी विविध विषयांवर गप्पा मारतात. काही स्पर्धक आपल्या आयुष्यातील अनुभव या मंचावरून शेअर करतात. काही जण बिग बींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारतात. बरेचदा बिग बी त्यांना उत्तरं देताना आयुष्यातील आठवणी सांगतात. आता नुकत्याच एका एपिसोडमध्ये अक्षय नावाचा स्पर्धक आला होता. त्याची कहाणी ऐकून अमिताभ बच्चन यांनी त्याला धीर दिला. तसेच त्यांनी भाऊ अजिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या नात्याबद्दलही सांगितलं.

हॉटसीटवर बसल्यावर अक्षयने त्याचा कॅन्सर झाल्यानंतरचा अनुभव सांगितला. “२०१८ मध्ये मला कॅन्सरचे निदान झाले. एक-दोन वर्षे उपचार सुरू होते. केमोथेरपी आणि शस्त्रक्रिया झाली. जेव्हा माझे मित्र कॉलेजला जात होते, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. हा खूप कठीण पण जीवन बदलून टाकणारा अनुभव होता.” त्यावर अमिताभ बच्चन अक्षयला म्हणाले, “मी तुमच्यासमोर बसलोय. मीही हॉस्पिटलच्या खूप फेऱ्या मारल्या आहेत. पण सर्वांच्या आशीर्वादाने मी सुखरूप बाहेर आलो. आणि तुमचे मित्र कॉलेजला जात होते, म्हणून तुम्ही नाराज व्हायचं कारण नाही, कारण ते केबीसीमध्ये आले नाहीत.”

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

बिग बी स्पर्धकांशी विविध विषयांवर बोलत असतात. एका दुसऱ्या स्पर्धकाने त्याच्या भावंडांबरोबरची एक मजेदार गोष्ट सांगितली. त्यानंतर अमिताभ यांनी धाकटे भाऊ अजिताभ यांच्याबरोबरची आठवण सांगितली. अमिताभ यांनी खुलासा केला की त्यांचं व त्यांच्या भावाचं नातं सामान्य भावंडांप्रमाणेच आहे.

भावामुळे सिनेसृष्टीत आले बिग बी; अजिताभ बच्चन यांच्याबद्दल म्हणाले, “आम्ही कोलकात्यात नोकरी करत होतो अन् त्याने…”

भांडायचो, धमकी द्यायचो – अमिताभ बच्चन

“आम्ही एकमेकांबरोबर अनेक गुपितं शेअर करायचो. ज्या गोष्टी आम्ही आई-वडिलांशी बोलू शकत नव्हतो. आम्ही खूपदा भांडायचो आणि एकमेकांची गुपितं आई-बाबांना सांगायची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचो,” असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. त्यांनी भावाबरोबरच्या जुन्या आठवणी सांगितल्यावर प्रेक्षक हसू लागले.

अमिताभ बच्चन व त्यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन (फोटो – एक्सवरून साभार)

“माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय”, अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न झाल्यावर जया यांच्या वडिलांनी व्याहींजवळ व्यक्त केलेल्या भावना

भावामुळे इंडस्ट्रीत आले अमिताभ बच्चन

यापूर्वी एकदा याच शोमध्ये भावामुळे सिनेसृष्टीत आल्याचं अमिताभ यांनी सांगितलं होतं. अजिताभ यांनी बिग बींना चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता. अमिताभ म्हणाले, “आम्ही कोलकात्यात नोकरी करत होतो. त्याने माझा फोटो काढला आणि एका स्पर्धेत पाठवला. पण त्या स्पर्धेसाठी माझी निवड झाली नाही. मात्र अजिताभने माझ्या मनात या क्षेत्रात येण्याचा विचार रुजवला. त्यानंतर मी कोलकात्यातील नोकरी सोडली होती.”

जया बच्चन यांना ‘या’ नावाने हाक मारायच्या रेखा; एकाच इमारतीत राहायच्या दोघी, अमिताभ अन् रेखांची पहिली भेट…

लंडनमध्ये राहतात अजिताभ बच्चन

What Ajitabh Bachchan Do: अजिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते एक उद्योजक आहेत आणि आपल्या कुटुंबाबरोबर लंडनमध्ये राहतात. त्यांच्या पत्नीचे नाव रमोला आहे. रमोला या अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीण होत्या. अजिताभ व रमोला यांना तीन अपत्ये आहेत.