अभिनेता अपारशक्ती खुराना आयुष्मान खुरानाचा धाकटा भाऊ आहे. या दोघांचा बाँड राम-लक्ष्मणसारखा आहे. दोघांचा जन्म चंदीगडमध्ये झाला आणि तिथेच ते मोठे झाले. नंतर रिअॅलिटी शो, टीव्ही, असा प्रवास करत ते सिनेसृष्टीत आले. आयुष्मान बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने मुख्य अभिनेता म्हणून अनेक चित्रपट केले आहेत, त्याउलट अपारशक्ती सहाय्यक भूमिकांमध्ये जास्त दिसतो. भाऊ जास्त यशस्वी असल्याचा खूप आनंद आहे, असं अपारशक्ती एका मुलाखतीत म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपारशक्ती खुरानाने शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. जेव्हापर्यंत ते दोघेही भाऊ एकत्र बसून जेवण करू शकतात, तोपर्यंत नात्यात काहीच अडचण नाही, असं अपारशक्ती भावाबद्दल म्हणाला. भावाबरोबर सातत्याने तुलना होते, त्याचा त्रास होतो का? असं विचारल्यावर त्याने नकार दिला. “कधीच नाही, २००% कधीच नाही, अजिबातच नाही. खरं तर मी स्वतः ही तुलना होताना पाहिली नाही. दुसरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आम्हाला रोज रात्री एकत्र बसून जेवताना पाहाल. आम्ही एकाच इमारतीत राहतो, आम्ही एकत्र जेवण करतो, आम्ही एकत्र व्यायाम करतो. ज्या दिवशी माझा भाऊ मला अशी जाणीव करून देईल की तो मोठा स्टार आहे, तो आमच्या नात्याचा शेवट असेल. लोक काय म्हणतात यामुळे नक्कीच आमच्या नात्यावर परिणाम होणार नाही”, असं अपारशक्ती म्हणाला.

हेही वाचा – धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारण्याबाबत दिलेलं उत्तर, म्हणालेले “मी असा माणूस…”

रोज आयुष्मानच्या पाया पडतो अपारशक्ती

अपारशक्ती म्हणाला की तो अजूनही दररोज सकाळी उठल्यावर आदर म्हणून भाऊ आयुष्मानच्या पाया पडतो. “आमचं नातं राम-लक्ष्मण प्रमाणे आहे. कधी कधी मला खरंच आश्चर्य वाटतं की दोन भाऊ चंदीगडहून इथे आले आणि सिनेमात यशस्वी झाले, हे शक्य आहे का? मला वाटतंय कदाचित मी हे आधी बोललो नाही, पण तो (आयुष्मान) माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे, याचा मला खूप आनंद आहे. कारण आमच्या राम-लक्ष्मण नात्यात असंच असायला हवं”, असं अपारशक्तीने नमूद केलं.

हेही वाचा – कपूर कुटुंबातील पहिला पण विस्मृतीत गेलेला स्टार, दिले होते अनेक हिट सिनेमे

किशोरवयात असताना दोन्ही भावांची भांडणं व्हायची, एकदा वडिलांना भांडणाचा राग आला आणि तेव्हापासून पाया पडण्याची पद्धत सुरू झाली, असं अपारशक्तीने सांगितलं. “त्यानंतर असं ठरलं की मी त्याला ‘भैय्या’ म्हणायचं आणि रोज सकाळी उठल्यावर त्याच्या पाया पडायचं. असं करायचं असेल तरच तुला या घरात राहता येईल, नाहीतर राहता येणार नाही असं वडील म्हणाले होते,” असं अपारशक्ती म्हणाला.

आयुष्मानबद्दल बोलायचं झाल्यास यावर्षी त्याचा एकही चित्रपट रिलीज झाला नाही. तर अपारशक्ती ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ मध्ये झळकला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aparshakti khurana says the day ayushmann khurrana will make him feel like he is bigger star that will be end hrc