‘वॉन्टेड’फेम अभिनेत्री आयेशा टाकिया ( ayesha takia ) सध्या मनोरंजन सृष्टीपासून लांब असली तरी ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आयशाचा ( ayesha takia ) पती फरहान आझमी ( abu farhan azmi ) याच्याविरुद्ध गोव्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आयेशाने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने गोव्यात महाराष्ट्राबद्दल अतिशय द्वेष असल्याचेही म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि याद्वारे तिने तिच्यावर कॅन्डोलिममध्ये गोंधळ निर्माण करण्याचा आणि स्थानिक लोकांशी भांडण केल्याचा आरोप असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर तिने तिच्या स्पष्टीकरणात एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिलं आहे, “कुटुंबासाठी ती एक भयानक रात्र होती आणि तिच्या मुलाला, पतीला क्रूरपणे धमकावले गेले होते. गोव्यातील स्थानिक गुंडांनी त्यांना घेरले, धमक्या दिल्या आणि छळ केला. त्यामुळे त्यांना जीव गमावण्याचीही भीती होती. माझ्या पतीने आमच्या व मुलाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना फोन केला. पण लोकांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले”.

आयेशाने या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे, “गोव्यात स्थानिकांकडून तिचा पती फरहान आझमी आणि त्यांच्या मुलाला वारंवार शिवीगाळ करण्यात आली. कारण- त्यांच्या मनात महाराष्ट्रातील लोकांबद्दल द्वेष आहे. गोव्यात महाराष्ट्राबद्दल द्वेष खूप वाढला आहे. कारण- ते महाराष्ट्रातील असल्याने आणि मोठी गाडी असल्याने फरहान आणि माझ्या मुलाला वारंवार शिवीगाळ करत होते. त्यानंतर पोलिसांनीही फरहानविरुद्ध तक्रार दाखल केली, तर प्रत्यक्षात १५० लोकांची मोठी गर्दी पाहून माझ्या पतीने मदतीसाठी १०० क्रमांकावर फोन केला होता”.

आयशा टाकिया इन्स्टाग्राम स्टोरी
आयशा टाकिया इन्स्टाग्राम स्टोरी

पुढे अभिनेत्रीने असा दावाही केला की, तिच्याकडे पुरावा म्हणून अनेक व्हिडीओ आणि सीसीटीव्ही फुटेज आहेत. तसेच तिने भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आणि ते कायदा अंमलबजावणी संस्थांना सहकार्य करत असल्याचेही सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू फरहान आझमी, त्यांचा मुलगा व त्यांचा ड्रायव्हर प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी सुपर मार्केटजवळ वळण घेतले असता, त्यांच्या मागच्या गाडीतील दोन स्थानिकांनी इंडिकेटर न वापरता किंवा सिग्नल न देता वळण घेतल्याचे म्हणत वाद घातला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayesha takia husband abu farhan azmi altercation actress shared post and said that hatred for maharashtra reached unbelievable heights in goa ssm 00