अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे ‘भोला’. भोला’च्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे. अखेर हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाचे जोरदार प्रदर्शन करण्यात आले आहे. सगळीकडे अजयच कौतुक होत असताना प्रसिद्ध अभिनेता निर्मात्याने त्याच्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरके म्हणजेच कमाल आर खान सोशल मीडियावर सक्रीय असतो. सामाजिक विषयांवर आणि बॉलिवूडबद्दल तो कायमच भाष्य करत असतो तसेच तो चित्रपटांचे समीक्षण करत असतो. त्याने ट्वीट करत अजय देवगणवर टीका केली आहे. तो असं म्हणाला, “ज्या प्रकारे अजय देवगणने ‘भोला’ चित्रपटात हिंदूंची थट्टा केली. त्याजागी जर हिरो खान असता तर चित्रपटाला संपूर्ण देशभरात बंदी घातली असती.” अशी टीका त्याने केली आहे.

Adipurush film : “मंत्रो से बढके…” ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित; प्रभासच्याबरोबरीने झळकला मराठमोळा अभिनेता

काही सिनेतज्ञ आणि मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १२ कोटीची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र प्रेक्षकांचा चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा आकडा वाढूही शकतो. या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटात एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे जो १० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो. परंतु त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. अजय देवगणच्या भोलामध्ये अभिनेत्री तब्बू, संजय मिश्रा, मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव असे दिग्गज अभिनेते आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor krk said that ajay devgan made fun of hindu religion in bhola film spg