बॉलिवूडची पार्टी म्हंटल की त्याची हमखास चर्चा होतेच. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार दिवाली पार्टीचे आयोजन करत आहेत. मनीष मल्होत्रापासून ते अभिनेत्री भूमी पेडणेकरपर्यंत, या पार्टींमध्ये अनेक कलाकार सामील झाले होते. कृष्ण कुमार यांनी आयोजित केलेल्या पार्टीतला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या पार्टीत सुझान खान तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनीसोबत पोहोचली. पण मग असं काय झालं की लोकांनी सुझानला ट्रोल करायला सुरुवात केली.
या पार्टीत अनेक कलाकार उपस्थित होते. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले सुझान खान आणि तिच्या बॉयफ्रेंडने, पार्टीच्या वेळी पापाराझींना फोटो देत असताना दोघे रोमॅंटिक झाले. दोघांनी एकमेकांना किस केले. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे.
एकाने लिहले आहे ‘कॅमेरासमोर या चुंबनांची गरज होती का? तुम्हाला काय झाले आहे’? तर काहींच्या मते ‘या दोघांनी कॅमेरासमोर अशा साठी किस केलं जेणेकरून हे दोघे चर्चेत येतील’. काही जणांनी तिच्या लूकवरून तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी यांच्या रोमँटिक अंदाजाला पाठिंबा दिला आहे. एकाने लिहले आहे ‘थोडी तरी लाज बाळगा’.
हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि अर्सलन गोनी गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. सुझान अनेकदा सोशल मीडियावर अर्सलनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दोघंही आपलं आयुष्य मोकळेपणाने जगत आहेत आणि त्यांनी आपलं नातं काही महिन्यांपूर्वी जगासमोर मांडलं आहे.