गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. एक म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’. या चित्रपटात नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि गिरीजा ओक अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर दुसरा म्हणजे ‘फुकरे ३’ होय. दोन्ही चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पाटेकर यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवसाची कमाई निराशाजनक, वाचा आकडे

‘फुकरे ३’ मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी अशी स्टार कास्ट आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता ही फुकरे गँग आधीच्या दोन भागांप्रमाणेच पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ‘फुकरे ३’ मध्येही हे स्टार्स दमदार अभिनयाने आणि विनादाने प्रेक्षकांना मनोरंजनाचा पूर्ण डोस देण्यात यशस्वी ठरले आहेत.

कतरिना कैफच्या दिराला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटो चर्चेत

शुक्रवारी गणेश विसर्जन असूनही ‘फुकरे ३’ चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे, त्यानुसार चित्रपटाने ‘द व्हॅक्सिन वॉर’ला मागे टाकत जबरदस्त ओपनिंग केली आहे.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘फुकरे ३’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ८.५० कोटींची कमाई केली आहे. हे अंदाजित आकडे आहेत. पण या चित्रपटाने ‘द व्हॅक्सिन वॉर’ला नक्कीच मागे टाकलं आहे. नाना पाटेकरांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पहिल्या दिवशी फक्त १.३० कोटींची कमाई करू शकला. सध्याची आकडेवारी पाहता ‘फुकरे ३’ येत्या काही दिवसांत चांगली कमाई करू शकतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fukrey 3 box office collection day 1 film earns 8 crore hrc