नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पूर्व पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. आलियाने नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते, त्या आरोपांना नवाजुद्दीनने प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच त्यांने त्याच्या मूळ गावी असलेली जमीनही भावांच्या नावे केली होती. अशातच आता त्याने आपली पूर्व पत्नी व भावांवर मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने भाऊ शमसुद्दीन आणि पूर्व पत्नी आलिया सिद्दीकी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी ३० मार्च रोजी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: अब्दू रोझिक व एमसी स्टॅनमधील वादाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला, “ते दोघेही…”

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने कोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्यावर लावलेले सर्व बिनबुडाचे आरोप मागे घ्यावेत आणि लेखी माफीही मागावी, अशी मागणी त्याने केली आहे. या प्रकरणी अभिनेत्याने १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्याने याचिकेत म्हटले आहे की, २००८ मध्ये त्याने धाकट्या बेरोजगार भावाला मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. तो अभिनेत्याच्या अकाउंटची सर्व कामं पाहत असे. या काळात नवाज सही केलेले चेक, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड त्याच्याकडे द्यायचा. मात्र भावाने आपली फसवणूक केली.

“तिला तीन गाण्यांसाठी काही लाख अन् आम्हाला टाळ वाजवून…” इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका

शमसुद्दीनने अनेकवेळा आपली पैशांची फसवणूक केल्याचेही नवाजने म्हटले आहे. एकदा त्याने फसवणूक करून प्रॉपर्टीही स्वतःच्या नावावर केली होती. त्याचप्रमाणे भावाने यारी रोडवर एक फ्लॅट, सेमी कमर्शियल प्रॉपर्टी, दुबईमध्ये प्रॉपर्टी आणि बुधना शहापूर इथं फार्महाऊस खरेदी केलं. याशिवाय त्याने १४ महागडी वाहनंही फेरफार करून घेतली होती. याबद्दल अभिनेत्याने त्याला विचारलं असता त्याने आलियाला भडकवलं.

फेसबुकवर मैत्री, प्रेम अन्…; प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने ६०व्या वर्षी थाटला होता संसार

नवाजनेही आलियावर गंभीर आणि मोठा आरोप केला आहे. नवाजच्या मते, आलिया म्हणजेच अंजना आधीच विवाहित होती, परंतु तिने हे आपल्यापासून लपवून ठेवलं होतं. दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीने भाऊ आणि आलियावर २१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui files 100 crore defamation case on ex wife aaliya siddiqui and brother shamsuddin hrc