गौतमी पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव आहे. अश्लील इशारे आणि डान्समुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. तिच्या डान्सला विरोध झाला, अनेक ठिकाणी कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाले आणि शेवटी गौतमीला माफी मागावी लागली होती. या सगळ्या गोष्टी घडून काही महिने झालेत, पण तरीही गौतमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतेच. आता कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

“पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

What Sharad Pawar Said?
शरद पवारांचं वक्तव्य, “रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी…”
Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. तिच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होते. याच सर्व मुद्द्यांवरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी इथे एका महोत्सवात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांनी नाव न घेता गौतमी पाटीलला टोला लगावला.

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर केतकी चितळेची पोस्ट; शरद पवार प्रकरणाचा संदर्भ देत म्हणाली…

“आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही,” असं इंदुरीकर महाराज या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेची गर्लफ्रेंड आहे ‘ही’ सोशल मीडिया स्टार? अभिनेता उत्तर देत म्हणाला…

दरम्यान, काही गेल्या महिन्यात गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडणाऱ्या गौतमीवर आता इंदुरीकर महाराजांनीही अप्रत्यक्ष टीका केली आहे.