Rashmika mandanna shared special experience of sharing screen with big b rnv 99 | "माझा अजूनही विश्वास बसत नाही...", रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट | Loksatta

“माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

ती आगामी ‘गुडबाय’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

“माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती आगामी ‘गुडबाय’ चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या ती अमिताभ बच्चन यांच्याबरोबर वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यादरम्यानचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला.

आणखी वाचा : प्रियांका चोप्राने साधला अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी संवाद, म्हणाली, “आपण दोघीही भारताच्या…”

रश्मिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि अमिताभ बच्चन फोटोला एकत्र पोज देताना दिसत आहेत. यावेळी रश्मिका मंदानाने साडी नेसली आहे तर अमिताभ बच्चनही भारतीय पेहरावात दिसत आहेत. हा फोटो नेटकऱ्यांना आवडला आहेच पण लक्ष वेधलं आहे ते रश्मिकाने लिहिलेल्या कॅप्शनने.

हा फोटो शेअर करताना रश्मिका मंदान्नाने एक खास नोट लिहिली, जी खूप वेगाने व्हायरल होत आहे. रश्मिका कॅप्शनमध्ये लिहिले, “माझा अजूनही विश्वास बसत नाही की हे माझ्या आयुष्यात घडत आहे. सरांसोबत चित्रीकरण करायला मिळणं, त्यांच्याशी बोलायला मिळणं, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करायला मिळणं, त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करायला मिळणं, फोटो काढायला मिळणं…ते खरोखर एक उत्कृष्ट कलाकार आहे. एक माणूस म्हणून तर ते रत्न आहेत आणि ते नेहमी माझ्याशी माझ्या चित्रपटातल्य वडिलांप्रमाणे वाद घालतात. या सगळ्यासाठी मी किती कृतज्ञ आहे. ‘गुडबाय’ चित्रपट मला तुमच्याबरोबर करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. हा अनुभव माझ्यासाठी कायमच स्पेशल राहील.”

हेही वाचा : “मी आजही माझ्या एक्सबरोबर…”, रश्मिका मंदानाने तिच्या अफेअरबद्दल केला मोठा खुलासा

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नीना गुप्ता आणि पवैल गुलाटी असे कलाकार दिसणार आहेत. तसेच या चित्रपटामध्ये सुनील ग्रोव्हर, एली अवराम, साहिल मेहता, अभिषेक खान यांनी सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विकास बहल यांनी ‘गुडबाय’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बिग बींचे ११ अजरामर चित्रपट पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर

संबंधित बातम्या

“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा
Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता दुसरीच्या कमरेत हात टाकून राम गोपाल वर्मांचं फोटोशूट, फोटो शेअर करत म्हणाले…
अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…
सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“भारतीय चित्रपट कंपनी पायघड्या….” पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याने मनसे नेते अमेय खोपकर संतापले
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच वेतन मिळणार; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून २०० कोटी रुपये मंजूर
‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून
INDW vs AUS T20Is: “हल्के मे मत लो!” ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय महिला संघाचा आव्हान उभे करणारा video व्हायरल
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद