बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट २१ एप्रिलला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाच्या माध्यमातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची खूप चर्चा होती.हा चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. पण या चित्रपटाने पहिल्या दिवशी निर्मात्यांचे अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही.
हेही वाचा- Video: बायकोची चप्पल उचलणं रणबीर कपूरला पडलं महागात; नेटकरी भडकले म्हणाले, “मुर्ख..”
किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील सलमान खानचा लूक, या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाणी या सर्वांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत होता. सलमानच्या चाहत्यांनी या चित्रपटाला प्रदर्शनाच्या आधीच अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या गाण्यांमुळे नेटकरी सलमानला ट्रोल करत होते. या चित्रपटाच्या गाण्यांना मिळणाऱ्या नापसंतीचा फटका या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनलाही बसला आहे. मात्र, आता चाहते भाईजानचा हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याची वाट बघत आहेत. हा चित्रपट कुठल्या ओटीटीवर रिलीज होणार याविषयी चाहत्यांना उत्सुक्ता आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’सारखी चांगली कामगिरी करेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं काहीही झालं नाही. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतातून फक्त १५ कोटींची कमाई केली. फक्त ‘पठाण’च नाही तर, सलमान खानच्या आधी रिलीज झालेल्या चित्रपटांच्या तुलनेतही ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई कमी आहे.
हेही वाचा- “तू मुसलमान कधीपासून झाला..”; ईदच्या शुभेच्छा देणं गायक शानच्या आलं आंगलट, सोशल मीडियावर गोंधळ
सलमानचा हा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट तमिळ चित्रपट ‘वीरम’चा रिमेक आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील दिसणार आहेत.साजिद नाडियादवाला याची निर्मिती करत आहेत.