अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाली की ती स्वत:ला सर्व्हायव्हर समजते, कारण डॉक्टरांनी तिची आई सुनंदा शेट्टी यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. शिल्पाच्या आईला वाटत होतं की त्या मुलीला गमावतील. कारण त्या गरोदर असताना गुंतागुंतीची परिस्थिती उद्भवती होती. त्या घटनेमुळे आपला जन्म एका उद्देशासाठी झाला आहे, असं शिल्पाला वाटू लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२५ कोटींच्या लाच प्रकरणात समीर वानखेडेंच्या बाजुने निकाल, आर्यनला सोडण्यासाठी शाहरुख खानकडून पैसे मागितल्याचा होता आरोप

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली, “माझ्या आईने मला सांगितले की जेव्हा तिची गर्भधारणा झाली, तेव्हा तिला वाटलं की ती मला गमावणार आहे आणि डॉक्टरांनी सुचवलं की तिने गर्भपात करावा कारण ती खूप कठीण परिस्थितीतून जात होती. तिला सतत रक्तस्त्राव होत असल्याने तिचा गर्भपात होईल असं वाटत होतं. अशात परिस्थितीतही माझा जन्म झाला, त्यामुळे मला वाटतं की मी सर्व्हायव्हर आहे.”

Video: ‘जवान’च्या चर्चेदरम्यान समीर वानखेडेंनी पाहिला ‘सुभेदार’, पोस्ट शेअर करत म्हणाले, “ते खरे वीर…”

शिल्पा पुढे म्हणाली, “म्हणून आईचा नेहमी असा विश्वास होता की माझा एका विशिष्ट उद्देशासाठी जन्म झाला आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की चित्रपट हे माझ्या आयुष्यातील प्रेरणा आहेत. मी कदाचित अशा लोकांसाठी प्रेरणास्थान म्हणून जन्मले आहे जे खूप गोष्टी सहन करून आयुष्यात पुढे जात आहेत. तुम्ही माझे सोशल मीडिया पाहिल्यास, मी सतत सकारात्मक मेसेज टाकत असते कारण आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप कठीण वेळ असतेच.”

यशासाठी समर्पण खूप महत्त्वाचे आहे आणि हा धडा तिने आयुष्यात खूप आधीच शिकला. तसेच ती मुलांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा पुरवते कारण आता ते लक्झरीयस वाटत असलं तरी ती व तिचा पती राज कुंद्रा मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत, असंही शिल्पा सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty mother sunanda was advised by doctors to abort her because of difficulty in pregnancy hrc