योगा हा शारीरिक आणि मानसिक फायद्यांसाठी महत्वाचा मानला जातो. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी योगाचा त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला आहे. योगामुळे मनावर आणि शरीरावर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या रोजच्या व्यायामात योगाचा समावेश करतात. एवढचं नाही तर त्या इतरांना योगा करण्यासाठी प्रोत्साहनही देत असतात. कोण आहेत त्या अभिनेत्री आणि त्यांच्या आयुष्यात योगाला काय स्थान आहे, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलायका अरोरा

मलायका अरोराला फिटनेस आयकॉन म्हणले जाते. मलायका योग अभ्यासकही आहे. ती नेहमी आपले योग सत्रे सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच लोकांना नियमित योगा करण्यासाठी प्रेरितही करत असते. तिच्या एकूण आरोग्यावर आणि तंदुरुस्तीवर योगाचा सकारात्मक प्रभाव असल्याचे तिने अनेकदा बोलून दाखवले आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी अनेक वर्षांपासून योगा करत आहे. शिल्पाचे अनेक योग डीव्हीडी प्रदर्शित केल्या आहेत. एवढेच नाही तर तिने स्वतःचे योग वेलनेस चॅनेल देखील सुरू केले आहे. ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून योगाच्या फायद्यांचा प्रचार करताना दिसते. बाबा रामदेव यांच्या मुंबईतील योग शिबिरातही ती सहभागी झाली होती.

करीना कपूर

करीना कपूर तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये योगाला महत्त्वाचं स्थान आहे. करीनाला तिच्या गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतरच्या वजन कमी करण्यासाठी योगाचा खूप मोठा वाटा आहे.

बिपाशा बसू

बिपाशा बसू योगाची अभ्यासक आहे. तिने योगा वर्कआउट्सच्या स्वतःच्या फिटनेस डीव्हीडी प्रदर्शित केल्या आहेत. योगा तिला फक्त तंदुरुस्त राहण्यास मदत करत नाही तर तिच्या मानसिक शांती देखील देतो असा विश्वास बिपाशाला आहे. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये ती अनेकदा तिचा पती अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत योगा करताना दिसते.

लारा दत्ता

माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता नियमित योगा करते. तिने “हील: द वर्ल्ड विथ लारा दत्ता” नावाची स्वतःची योगा डीव्हीडी प्रदर्शित केली आहे. योग हा एक सर्वांगीण सराव आहे जो केवळ शारीरिक तंदुरुस्तीच वाढवत नाही तर मानसिक स्पष्टता देखील वाढवतो, असे लारा दत्ताचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpa shetty to kareena kapoor these bollywood actress keep themselves fit with yoga dpj