Suniel Shetty Injured : अभिनेता सुनील शेट्टी १९९० च्या दशकातील सिनेमांत अॅक्शन सीन्स देत त्याच्या जबरदस्त शरीरयष्टीने प्रेक्षकांचे मन जिंकत असे. अनेक वर्ष अॅक्शन सिनेमे केल्यावर सुनील शेट्टी कॉमेडी सिनेमांकडे वळला. काही वर्ष सुनील शेट्टी अॅक्शन सिनेमांपासून दूरच होता. मात्र, सुनील शेट्टी पुन्हा एकदा अॅक्शन कलाकृतीत दिसणार असून हा सिनेमा नसून एक वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचं सध्या शूटिंग सुरू असून या सेटवर सुनील शेट्टीचा अपघात झाला आहे.
अभिनेता सुनील शेट्टी नुकताच त्याच्या आगामी वेब शो ‘हंटर’च्या सेटवर जखमी झाला. या शोचं मुंबईत शूटिंग सुरू होतं, सुनील शेट्टीने त्याच्या सर्वच स्टंट्स स्वतः करण्याचं ठरवलं होतं. यातील एका सीनमध्ये स्टंट करत असताना सुनील शेट्टी जखमी झाला आहे.
हेही वाचा…हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
एका फायटिंग सीनमध्ये, चार ते पाच फायटरबरोबर सुनील शेट्टी सीन शूट करत असताना हा अपघात घडला. या दृश्यात एका लाकडी ओंडक्याचा वापर करण्यात आला होता, परंतु सीन शूट करत असताना चुकीच्या टायमिंगमुळे ओंडका चुकून सुनील शेट्टीच्या बरगड्यांवर जोरात लागला. घटनेच्या वेळी सुनील शेट्टीला अत्यंत वेदना होत असल्याचं प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार समजलं. सेटवरील सगळ्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता पसरली. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील शेट्टीसाठी तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली. सेटवरच डॉक्टर आणि एक्स-रे मशीनची व्यवस्था करण्यात आली होती, सुनीलला गंभीर दुखापत किंवा अंतर्गत इजा झाली की नाही याची तपासणी करण्यात आली.
एक अॅक्शन हिरो अशी सुनील शेट्टीची बॉलीवूडमध्ये ओळख आहे. भूमिका वास्तववादी वाटावी यासाठी तो स्वतः त्याचे स्टंट करतो. सुनील शेट्टीच्या सेटवरील अपघातानंतर संपूर्ण टीम त्यांच्या आरोग्याबद्दल काळजीत आहे.
सुनील शेट्टी लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे.