बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मुलगा करण याच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आज करण द्रिशा आचार्यबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून करणच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. धर्मेंद्र यांच्यासह सनी देओलही लेकाच्या लग्नाचा आनंद घेत आहेत. आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देओल कुटुंबियांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये करण घोड्यावरुन लग्नमंडपात जात आहे. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र, सनी तसेच देओल कुटुंबिय वरातीचा आनंद घेत आहेत. या वरातीमध्ये धर्मेंद्रही आनंदाने नाचताना दिसत आहेत. तसेच वरातीतील मंडळींच्या पारंपरिक लूकनेही लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायनच्या नात्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला कळालं होतं अन्…; म्हणाल्या, “कल्पना होती पण…”

वराती दरम्यानचा करण व सनी देओलच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये करण घोड्यावरुन खाली उतरत असताना सनी त्याची योग्य ती काळजी घेत आहे. तसेच घोड्यावरुन उतरण्यासाठी सनी लेकाची मदत करत आहे. करण डिझायनर शेरवानीमध्ये अगदी उठून दिसत आहे.

आणखी वाचा – लेह-लडाखला पोहोचले समीर चौघुले, फोटो पाहून प्राजक्ता माळीची कमेंट, म्हणाली, “दादा…”

धर्मेंद्र त्यांच्या नातवाच्या वरातीमध्ये आनंदाने नाचत आहेत पाहून चाहतेही त्यांचं कौतुक करत आहेत. लेकाच्या वरातीत सनी देओलचा स्वॅग पाहून त्याच्या लूकचं कौतुक होत आहे. तर बॉबी देओलनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने सनी लेकाचं लग्न करत आहे हे पाहून नेटकरी देओल कुटुंबियांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny deol dharmendra dance in karan wedding video goes viral on social media see details kmd