हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आपल्यात नाही. पण सुशांतचे नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनते. सुशांतच्या मृत्यूला २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, पण आजही चाहते सुशांतला विसरू शकलेले नाहीत. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतची आवडती पांढरी रेंज रोव्हर कार दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतची आठवण आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूतची पांढऱ्या रंगाची MH02GD4747 नंबर असलेली कार स्पष्टपणे दिसत आहे. सुशांत सिंह राजपूतचे हे वाहन त्याच्या पटणा येथील घरी आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुशांतचा फोटो कारच्या शेजारी असलेल्या टेबलवर ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा : श्रद्धा कपूरबरोबर प्रमोशन करायला आलियाने मनाई केली का? चाहत्यांच्या प्रश्नावर रणबीर कपूरचं स्पष्ट उत्तर

सुशांत सिंग राजपूतच्या कारचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येत आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या मृत्यूबद्दल काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या, पण त्यापैकी काहीच सिद्ध होऊ न शकल्याने पुन्हा हा विषय बंद झाला आहे. सोशल मीडियावर सुशांतच्या नावाचं हॅशटॅग ट्रेंडमध्ये दिसतच असतं, आता त्याच्या या कारच्या व्हिडिओमुळे चाहते आणखीनच भावूक झाले आहेत.

हा व्हिडिओ पाहून चाहते सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की “सुशांत सिंह राजपूत आमच्यात नाही यावर आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही.” दुसर्‍या युजरने कमेंट केली आहे की, “हे जग खूप वाईट आहे, ते कोणालाही आनंदी आणि यशस्वी पाहू शकत नाही.” याशिवाय आणखी एक युझर म्हणतो की, “आम्ही एक पवित्र आत्मा गमावला आहे, परंतु तो यापेक्षा खूप जास्त पात्र होता.” यावरून आपल्याला अंदाज येतो की आजही सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून त्याचे चाहते सावरलेले नाहीत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput favourite range rover car spoted in patna video viral fans gets emotional avn