गेल्या काही दिवसांपासून तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia ) आणि विजय वर्मा ( Vijay Varma ) खूप चर्चेत आहेत आणि चर्चेत कारण आहे ब्रेकअप. दोघांच्या ब्रेकअप झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. तमन्ना भाटियाने विजयबरोबर अनेक रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केले. तेव्हापासून तमन्ना आणि विजयमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा आहे. पण, अजूनपर्यंत दोघांनी या ब्रेकअपच्या चर्चेबाबत मौन धारण केलं आहे. तमन्ना व विजयची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तमन्ना भाटिया आणि विजय वर्माने रवीना टंडनच्या घरी एकत्र धुळवड साजरी केली. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण लग्न असल्याचं म्हटलं जात आहे. तमन्नाला विजयशी लग्न करायचं होतं. पण, विजय लग्नासाठी तयार नव्हता, म्हणून दोघांनी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, ब्रेकअपनंतरही तमन्ना व विजय यांच्यातली मैत्री तशीच राहणार आहे. त्यामुळे दोघं १४ मार्चला एकत्र धुळवड साजरी करताना दिसले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रवीना टंडनच्या घरी धुळवडनिमित्ताने खास सेलिब्रेशन आयोजन करण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनमध्ये तमन्ना व विजय देखील होते. हे सेलिब्रेशन सुरू होण्यासाठी तमन्ना व विजय रवीनाच्या घराबाहेर वेगवेगळे दिसले. धुळवड झाल्यानंतरही दोघं रवीनाच्या घरातून बाहेर पडताना पाहायला मिळाले. त्यामुळे तमन्ना भाटिया व विजय वर्मामध्ये पॅचअप झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंदा झाला आहे. रवीना टंडनची मुलगी राशा थडानीशी तमन्ना भाटिया व विजय वर्माचं खूप चांगलं नातं आहे. राशा दोघांना दत्तक पालक असल्याचं म्हणते. त्यामुळे राशा, तमन्ना आणि विजयचे बरेच फोटो, व्हिडीओ एकत्र पाहायला मिळतात.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी जेव्हा न्यू इअरच्या गोव्यातील पार्टीमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर दोघं मुंबई विमानतळावरही एकत्र दिसले होते. मग ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती. या चित्रपटामध्ये दोघं बोल्ड सीन करताना दिसले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamannaah bhatia and vijay varma celebrate together holi in raveena tandon house pps