सुदीप्तो सेनचा ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधील ३२ हजार महिलांचे धर्मांतर करून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी केल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या कथेचे काही लोक समर्थन करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या वेळी दिग्दर्शक सुदीप्तो सेन, निर्माता विपुल अमृतलाल शाह आणि अदा शर्मा उपस्थित होते. प्रदर्शनानंतर दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी चित्रपटाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “भीक मागून..”; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाबाबत अभिनेत्याचे मोठं वक्तव्य

चित्रपटाचे निर्माते सुदिप्तो सेन यांनी सांगितले की, चित्रपटात असे दाखविण्यात आले आहे की, सुमारे ३२ हजार महिलांनी आधी इस्लाम स्वीकारला आणि नंतर त्यांना सीरियाला पाठवण्यात आले. मात्र, ३२ हजार या आकड्याने काही फरक पडत नाही, एका मुलीबाबत जरी असे घडले असेल तर कथा बाहेर यायला हवी, असे सुदिप्तो सेन म्हणाले.

हेही वाचा- Video : ‘मेट गाला’मध्ये आलियाला ऐश्वर्या म्हणत फोटोग्राफर्सनी मारली हाक; अभिनेत्रीने बघितले अन्..

सुदिप्तो सेन पुढे म्हणाले की ३२ हजार संख्या ही अंदाजे आकडेवारी आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी म्हणाले होते की, २०१४ मध्ये ९०० मुलींच्या धर्मांतराचे प्रकरण उघडकीस आले होते. यानंतर २०१५ आणि १६ या वर्षांची कोणतीही आकडेवारी समोर आली नाही, त्यामुळे जुनी आणि त्यानंतरची आकडेवारीही जोडण्यात आली आहे. दुसरीकडे, केरळमधील लोकांचे म्हणणे आहे की, हा आकडा ५० हजारांहून अधिक आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर अनेक जण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा चित्रपट’ म्हणत आहेत. चित्रपटावर होणाऱ्या या टीकेमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला ३२००० हा महिलांचा आकडा बदलण्यात आला आहे. याबरोबरच सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात १० बदल करण्यास सांगितले आहेत. अदा शर्मा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The kerala story director sudipto sen said conversion of more than 50 thousand girls in kerala dpj