हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि ‘बिग बॉस ११’ फेम सपना चौधरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सपनाच्या भावाच्या पत्नीने तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सपना, तिचा भाऊ कर्ण आणि आई नीलम यांच्याविरुद्ध पलवलच्या महिला पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी मारहाणीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सपना चौधरीच्या भावावर त्याच्या पत्नीने अनैसर्गिक लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत. पलवल येथील रहिवासी असलेल्या सपनाच्या वहिनीने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिने तक्रारीत म्हटले आहे की, २०१८ साली दिल्लीतील नजफगढ येथील रहिवासी सपना चौधरीचा भाऊ कर्ण याच्याशी तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि तिला अनेकदा मारहाणही केली जात होती, पण मुलगी झाल्यानंतर सासरच्यांनी मुलीसाठी झालेल्या कार्यक्रमात क्रेटा कारची मागणी केली. तिच्या वडिलांनी ३ लाख रुपये रोख आणि सोने-चांदी, कपडे दिले, मात्र तरीही तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने क्रेटा कार आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला.

आणखी वाचा- “तिच्याबरोबर माझं नाव….” सपना चौधरीशी होणार्‍या तुलनेवर गौतमी पाटीलचे स्पष्टीकरण

सपनाच्या वहिनीने असाही आरोप केला आहे की २६ मे २०२० रोजी तिच्या पतीने दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. दरम्यान ६ महिन्यांपूर्वी ती तिच्या माहेरी पलवल येथे आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोप निश्चित झाल्यानंतरच आरोपींना अटक करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा- आई झाल्यानंतर करिअर संपलं म्हणणाऱ्यांवर सपना चौधरीचा संताप; म्हणाली “तुमचा जन्म…”

दरम्यान सपना चौधरी ही हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आहे. तिचे स्टेज शो पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. ती ‘बिग बॉस ११’मध्ये दिसली होती, जिथे तिने तिच्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली होती. वडिलांच्या निधनानंतर तिने घराची जबाबदारी सांभाळली आणि ती डान्स स्टेज शो करू लागली. सपनाने असेही सांगितले होते की, तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. सपनाचा बिग बॉस ११ मधील प्रवास फार मोठा नसला तरी तिने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग करताना दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against sapna choudhary and her family by her sister in law for dowry mrj