scorecardresearch

आई झाल्यानंतर करिअर संपलं म्हणणाऱ्यांवर सपना चौधरीचा संताप; म्हणाली “तुमचा जन्म…”

“धीर धरा, प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवलाय”

आई झाल्यानंतर करिअर संपलं म्हणणाऱ्यांवर सपना चौधरीचा संताप; म्हणाली “तुमचा जन्म…”

सुप्रसिद्ध ‘हरियाणवी डान्सर’ आणि स्टेज परफॉर्मर सपना चौधरी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. सपना चौधरीला सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आई झाल्यानंतरही तिला अनेकांनी ट्रोल केले होते. मात्र आता सपना चौधरीने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सपना चौधरी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. तिचे जीवन अनेक वाद आणि चढ उतारामधून गेले आहे. सपना चौधरीने २०२० मध्ये गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर २०२१ मध्ये तिने बाळाला जन्म दिला होता. यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर आता नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : सपना चौधरी घेणार सोशल मीडियापासून ब्रेक, पोस्ट शेअर करत म्हणाली “राम राम…”

यावेळी ती म्हणाली, “आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा आपण पडतो, उठतो, मग सावरतो, मग पुन्हा पडतो आणि पुन्हा उठतो. माझे आयुष्य पहिल्यापासून असेच राहिले आहे. मी पडते, उठते, पुन्हा पडते आणि पुन्हा चालायला सुरुवात करते.”

“माझं लग्न होऊन जेव्हा मला मूल झाले तेव्हा मला अनेकांनी तू आता काय करणार, असे टोमणे मारले. आता ती संपली, आता सपनाचे करिअर संपले आहे असेही अनेकजण मला बोलले. पण तुम्हा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या प्रत्येकाचा जन्म हा एका आईपासूनच झालेला आहे. आई झाल्यानंतर एक स्त्री आणखी ताकदवान बनते. मला जिंकायचं आहे. पडायचं आहे. पण मी पडले तरी मी पुन्हा उठेन आणि मी पुन्हा चालेन. जे कोणी करू शकत नाही ते मी करु शकते”, असे सपना चौधरीने या व्हिडीओत म्हटले.

आणखी वाचा : “वर्ष पुढे सरकत असताना…” अंकुश चौधरीसाठी बायकोची खास पोस्ट

विशेष म्हणजे सपनाने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिने खास कॅप्शनही दिले आहे. “धीर धरा, प्रत्येकाचा चेहरा लक्षात ठेवलाय आणि प्रत्येकाची वेळ कधी ना कधी नक्कीच येईल”, असे सपना चौधरीने म्हटले आहे. सपना चौधरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओला अनेकजण लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 19:00 IST