Twitter चे सीईओ पराग अग्रवाल आणि गायिका श्रेया घोषालचे खास नातं तुम्हाला माहितीये का?

पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानतंर श्रेयाचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ट्वीटरला ओळखले जाते. ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर सर्वत्र पराग अग्रवाल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल यांचे खास नाते आहे.

पार्श्वगायिका श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल यांचे खास नात असल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे समोर आली आहे. त्यांच्या काही जुन्या पोस्टवरुन त्या दोघांमधील खास नाते असल्याची बातमी व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया घोषाल आणि पराग अग्रवाल हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र आहेत. पराग हा खाण्याचा आणि फिरण्याचा फार शौकीन आहे, असे श्रेयाचे म्हणणं आहे. यानिमित्ताने श्रेया घोषाल हिचे ११ वर्षांपूर्वीचे एक ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. यात श्रेयाने तिची लहानपणाची मैत्री आणि पराग अग्रवालबद्दल सांगितले आहे. “आणखी एक बालपणीचा मित्र पराग अग्रवाल सापडला. खाद्यप्रेमी आणि प्रवासाची आवड असणारा. स्टॅनफोर्डचा हुशार विद्यार्थी. काल त्यांचा वाढदिवस होता, कृपया त्यांना शुभेच्छा द्या,” असे ट्वीट श्रेयाने केले होते. पराग अग्रवाल यांची ट्वीटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानतंर श्रेयाचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “माझ्या राजीनाम्याचं पहिलं कारण त्याची…”, ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

विशेष म्हणजे पराग आणि श्रेया यांची मैत्री इतकी घट्ट आहे की, श्रेयाच्या लग्नसभारंभातही पराग सहभागी झाला होता. याचे अनेक फोटो व्हायरल होत आहे. इतकंच नव्हे तर पराग आणि श्रेयाचे अनेक फोटो, ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतंच पराग अग्रवालने ट्विटरचे नवे सीईओ झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर श्रेया घोषालने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभिनंदन पराग, आम्हाला तुझा फार अभिमान वाटतो. हा आमच्यासाठी फार मोठा दिवस असून तो आम्ही साजरा करत आहोत,” अशा शब्दात श्रेयाने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Twitter ला मिळणार Made In India सीईओ… जाणून घ्या पराग अग्रवाल नक्की आहेत तरी कोण?

दरम्यान ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. पराग अग्रवाल यांनी मुंबई आयआयटीमधून कंप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंगमध्ये बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. आयआयटीमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर पराग यांनी अमेरिकेतील स्टॅण्डफोर्ड विद्यापिठामधून कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पराग यांनी मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहू रिसर्च येथे महत्वाच्या पदांवर काम केलं. पराग २०११ पासून ट्विटर या कंपनीच्या सेवेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How is shreya ghoshal related to twitter ceo parag agrawal know the relation nrp

Next Story
शाल्मलीने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी