आज २७ मार्च म्हणजेच जागतिक रंगभूमी दिन. आज या दिनाचं औचित्य साधून अनेक कलाकारांनी रंगभूमीवर त्यांचं असलेलं प्रेम व्यक्त केलं, नाटकादरम्यान त्यांना आलेले अनुभव शेअर केले, रंगभूमीने त्यांना काय दिलं हे त्यांनी सांगितलं. तर आज किरण माने यांनी देखील त्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण मानेंनी तल्लख बुद्धीच्या जोरावर ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५ मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या शो नंतर किरण माने सातत्याने चर्चेत आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप वाढला आणि किरण माने सोशल मीडियावर सक्रीय राहून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतात.

हेही वाचा : फोटोत दिसणाऱ्या ‘या’ मुलीला ओळखलंत का? आज आहे आघाडीची मराठी अभिनेत्री

त्यांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये कामं केली. आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत रंगभूमीने त्यांना काय दिलं हे सांगितलं. त्यांनी लिहिलं, “सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं ! काल एका पत्रकारमित्राचा फोन आला, “उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?”

आणखी वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत किरण मानेंनी केली पोस्ट, म्हणाले “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने…”

पुढे ते म्हणाले, “रंगभूमीनं काय दिलं?- रंगभूमीनं काय दिलं नाही? रंगभूमीनं ओळख दिली..आत्मविश्वास दिला..भवतालाचं, समाजाचं भान दिलं..भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच ‘बोली’चा गोडवाही दिला..उच्च अभिरूचीचं वरदान दिलं…सांस्कृतीक श्रीमंती दिली..”रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? .. त्यामुळे सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत त्यांच्या कामाचं आणि त्यांनी मांडलेल्या या भावनांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shared special post on the occasion of world theatre day rnv
First published on: 27-03-2023 at 18:17 IST