‘आमिर खानचं करिअर संपलं’ म्हणत केआरकेने शाहरुख-सलमानलाही दिला ‘हा’ इशारा

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी निराशाजनक आहे

‘आमिर खानचं करिअर संपलं’ म्हणत केआरकेने शाहरुख-सलमानलाही दिला ‘हा’ इशारा
krk aamir khan बॉयकॉट लाल सिंग चड्ढा

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी निराशाजनक आहे. चित्रपटाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली आहे. अनेक शो या चित्रपटाचे रद्द करण्यात आले. आता या सुमार कामागिरीवर समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खानने प्रतिक्रिया दिली आहे.

केआरकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या एका पोस्टमध्ये आमिर खानच करियर संपल्याचा दावा केला आहे. यासोबतच केआरकेने शाहरुख खानलाही इशारा दिला आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या खराब व्यवसायानंतर केआरकेने सलमान आणि शाहरुखला त्यांचे चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्यास सांगितले आहे.

आणखी वाचा- ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये सलमान खानच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण सलमानच्या चित्रपटाचा उल्लेख आपल्या खास शैलीत केला आहे. या ट्विटमध्ये त्याने केवळ शाहरुख खानला टॅग केले आहे.

दरम्यान केआरकेचे ट्विट्स कायमच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटांचे तो आपल्या शैलीत समीक्षण करत असतो. ट्विटरवर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखपासून ते अगदी श्रेयस तळपदे सारख्या कलाकारांवर तो कायमच टीका करताना दिसून येतो.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा आगामी चित्रपट आता प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. ‘बॉयकॉट पठाण’ (#BoycottPathan) ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ‘पठाण’ हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख सध्या ‘डंकी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अभिनेता विजय सेतुपती देणार शाहरुख खानला टक्कर, दिसणार ‘या’ चित्रपटात एकत्र
फोटो गॅलरी