मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मराठी चित्रपटसृष्टीपासून ते अगदी बॉलिवूड चित्रपटांवरही आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या पूजाचा ‘दगडी चाळ २’ हा प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट. पूजा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये काम करण्यात व्यग्र आहे. मात्र काम करत असताना तिला आजारपणाचा सामना करावा लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

कामाबाबत असो वा खासगी आयुष्याबाबत पूजा प्रत्येक माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांपर्यंत पोचवते. आताही गेले दोन दिवस ती विविध पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे पूजा सध्या घरीच आहे. तिला शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिने स्वतःच माहिती दिली होती.

आणखी वाचा – दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट; ४५ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री शोधतेय तिसरा जोडीदार, एकटीच करते मुलांचा सांभाळ, म्हणाली, “कधीतरी…”

आता पुन्हा एकदा तिने फोटो शेअर करत नवी माहिती दिली. या फोटोमध्ये ती झोपलेली दिसत आहे. तसेच तिची प्रकृती आता कशी आहे याबाबत पूजाने सांगितलं. पूजा म्हणाली, “माझं खूप काम बाकी आहे. पण मला बोलणं व चालणंही कठीण झालं आहे. मला या आजारपणाचा राग येतो. तरीही आपल्या आरोग्याची काळजी महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या”.

याचबरोबरन पूजाने सगळ्यांना मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. पूजाने तिला हा त्रास नेमका कशामुळे होत आहे? हे उघड केलं नाही. पण या पोस्टबरोबरच तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पूजाची बहिण तिला औषधी काढा देताना दिसत आहे. आजारपणानंतर पूजा लवकरच तिच्या पुढीला कामाला सुरुवात करेल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress pooja sawant suffer from viral infection cant able to walk and talk share post on instagram see details kmd