हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ काल (२४ नोव्हेंबरला) प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग झिम्मा २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ‘झिम्मा २’ लाही प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड लागलेले पहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करणं सोप्प का आहे? हेमंत ढोमेने स्पष्ट सांगितलं; म्हणाला, “आपली सिस्टीम…”

‘झिम्मा’ ला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक ‘झिम्मा २’ ची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुक्ता होती. अखेर ‘झिम्मा २’ प्रदर्शित झाला. राज्यभरात या चित्रपटाला प्रेक्षवर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये बायकांची गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान हेमंत ढोमेने आपल्या इन्स्टाग्रामवर एका चित्रपटगृहातला व्हिडीओ शेअर केला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही मिनिट अगोदर ‘झिम्मा २’ च्या कलाकारांनी थेट चित्रपटगृहामध्ये जाऊन प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘झिम्मा २’ च्या कलाकरांना प्रत्यक्ष बघून प्रेक्षक महिला जोरजोरात ओरडताना दिसत आहेत. महिलांनी ‘झिम्मा २’ च्या जयघोषाने संपूर्ण चित्रपटगृह दणाणून सोडलं होतं. हेमंतने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं. “आनंदाचा हाउसफुल्ल शो!” हेमंतचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- ‘झिम्मा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई

‘झिम्मा २’ मध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेबरोबर त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. झिम्मा २ मध्ये सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemant dhome shared video regarding his housefull film jhimma 2 dpj