scorecardresearch

Premium

‘झिम्मा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई

Jhimma 2 box office collection day 1: सात बायकांच्या रियुनियनची मनाला भावणारी गोष्ट, पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर

Jhimma 2 box office collection day 1
'झिम्मा २' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन (फोटो – हेमंत ढोमे इन्स्टाग्राम)

Jhimma 2 box office collection day 1: मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा पहिला भाग दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर आता याचा दुसरा भाग ‘झिम्मा २’ २४ नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. लंडनला एका सहलीवर गेलेल्या सात बायकांची गोष्ट पहिल्या भागात हेमंत ढोमेने उत्तमरित्या सादर केली होती. आता दुसऱ्या भागात या बायकांचं रियुनियन पाहायला मिळत आहे.

‘झिम्मा २’ बद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारीही समोर आली आहे. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘झिम्मा २’ ने पहिल्या दिवशी १.२० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

lal-salaam-box-office-day1
रजनीकांत यांच्या ‘लाल सलाम’ची निराशाजनक सुरुवात; पहिल्याच दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी
the-kerala-story-ott-release
अखेर आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर ‘द केरला स्टोरी’ येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?
Irfan Pathan and Safa Baig Wife
इरफान पठाणने पहिल्यांदाच दाखविला पत्नीचा चेहरा; लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट
yami gautams pregnancy rumours
लग्नाच्या तीन वर्षानंतर यामी गौतम होणार आई? अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

राज्यभरातील थिएटर्समध्ये चित्रपटाच्या शोला मिळालेल्या प्रेक्षकांची सरासरी टक्केवारी समोर आली आहे. सकाळच्या शोला १२.०५%, दुपारचे शो – १४.६६%, संध्याकाळचे शो – १४.८७% आणि रात्रीचे शोला २५.९७% टक्के प्रेक्षक मिळाले. आता शनिवार व रविवारी वीकेंड असल्याने ‘झिम्मा २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

“हसवतात, रडवतात अन्…”, अंकुश चौधरीने पहिल्याच दिवशी पाहिला ‘झिम्मा २’! शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, ‘झिम्मा’मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सायली संजीव, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले हे कलाकार होते. तर ‘झिम्मा २’मध्ये आधीचेच सर्व कलाकार आहेत. फक्त सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले यांच्या पात्रांना पहिल्या भागात निरोप देऊन शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांची नवीन पात्रं समाविष्ट करण्यात आली आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi movie jhimma 2 box office collection day 1 nirmiti sawant rinku rajguru suhas joshi hrc

First published on: 25-11-2023 at 10:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×