marathi director viju mane commented on politics and common man spg 93 | "कुणाचं भाषण कस झालं हे सांगण्यापेक्षा..." दिग्दर्शक विजू माने यांची 'ती' पोस्ट चर्चेत | Loksatta

“कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा…” दिग्दर्शक विजू माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

स्वतः उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही.

“कुणाचं भाषण कसं झालं हे सांगण्यापेक्षा…” दिग्दर्शक विजू माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
marathi director share post

मराठी चित्रपट दिग्दर्शक विजू माने कायमच चर्चेत असतात. कविता असो किंवा चित्रपट अथवा वेबसिरीज विजू माने प्रेक्षकांना कायमच मनोरंजनाची मेजवानी देत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘पांडू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. समाजातील घडणाऱ्या घटनांवर ते कायमच भाष्य करत असतात. सोशल मीडियावर ते व्यक्त होत असतात. मागे पुरुषोत्तम एकांकिकेबाबत त्यांनी पोस्ट शेअर केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली होती.

नुकतीच त्यांनी एक पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये एका माणूस झोपलेला दाखवला आहे आणि त्या फोटोवर कॅप्शन दिला आहे की ‘स्वतः उठून नेतृत्व करण्याची माझी पात्रता नाही. त्यामुळे कुणाचं भाषण कस झालं हे सांगण्यापेक्षा… माझा झेपेल ते मी करतो…. असं लिहलं आहे. तर पोस्ट खाली कॅप्शन दिला आहे माझी झोप मला प्यारी **** गेली दुनियादारी. stop being political expert. better leave them upto politicinas’. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Review : दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान समजायला लावणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’

विजू माने यांची पोस्ट व्यंग्यात्मक जरी असली तरी त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे त्यांनी पोस्टमधून सांगितले आहे. सध्या चर्चा आहे ती दसऱ्याच्या निमित्ताने झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची, यावरून समाजमाध्यमात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. मराठी कलाकार सध्या सुरु राजकारणावर भाष्य करताना दिसून येतात.

दरम्यान विजू माने पांडूनंतर स्ट्रगलर साला’ या वेबसीरीजवर काम करत आहेत. या वेबसीरीजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. नुकतेच तिसरे पर्व सुरु झाले आहे. नेटकऱ्यांचे भरभरून प्रतिसाद या वेबसीरीजला येत आहेत. विजू माने यांना नुकताच झी कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. ,

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Review : दिल्लीच्या तख्ताला मराठी मुलुखाचा स्वाभिमान समजायला लावणारा ‘शिवप्रताप गरुडझेप’

संबंधित बातम्या

“मन भरलं म्हणून…” घटस्फोटाच्या चर्चांवरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर
मानसी नाईकचे पती प्रदीप खरेरावर गंभीर आरोप, म्हणाली “पैसे व प्रसिद्धी मिळवण्यासाठी…”
बहुचर्चित ‘गोदावरी’ चित्रपटातील गाणे प्रदर्शित; राहुल देशपांडे, जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केल्या भावना
Video : गावाशी नाळ जोडलेली राहावी म्हणून मराठमोळ्या अभिनेत्रीने फ्लॅटमध्येच मांडली चूल, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
“मला राजकारणात…” राजकीय प्रवेशाच्या चर्चांवर हेमंत ढोमेचे थेट वक्तव्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
स्वयंपाक करताना अचानक गॅस संपण्याची भीती? आता व्हा टेंशन फ्री, जाणून घ्या शिल्लक गॅस ओळखण्याच्या सोप्या पद्धती
Tips To Reduce Electricity Bill: मस्तच! वीजबिल येईल कमी; ताबडतोब घरात बसवा ‘हे’ डिव्हाइस
लोणावळ्यात बंगल्यातील जलतरण तलावात बुडून बालिकेचा मृत्यू
पुणे: नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ई-रजिस्ट्रेशन प्रणालीसाठी राष्ट्रीय पुरस्कार
विक्रम गोखले यांच्या निधनाने बिग बी भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाले “भूमिका निभावली आणि हा मंच…”