अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेचा विवाहसोहळा काही महिन्यांपूर्वी पार पडला. या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम प्रत्येक व्हिडीओ तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. शिवानी-विराजस कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आता याव्यतिरिक्त दोघांनी एक नवी सुरुवात केली आहे. सतत काही ना काही नवं करण्याच्या शोधात असणाऱ्या या कपलने आता नवा व्यवसाय सुरु केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – बॉयफ्रेंडशीच केलं लग्न, पण त्याआधीच दुसऱ्या व्यक्तीशी…; लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर शिल्पा तुळसकरचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

शिवानी-विराजसने अभिनयक्षेत्रात उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरच स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. शिवानी व विराजसने सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करत नवा व्यवसाय सुरु केला असल्याचं सांगितलं आहे.

दोघांनी ‘विरानी’ नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे. या ब्रँडची खासियत म्हणजे फक्त नाटक प्रेमींसाठी या ब्रँड अंतर्गत खास टी-शर्ट तयार करण्यात येणार आहेत. ‘रफु चक्कर’ या ब्रँडबरोबर त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. ‘रफु चक्कर’च्या वेबसाईटवर ‘विरानी’चे टी-शर्ट तुम्हालाही खरेदी करता येणार आहेत.

आणखी वाचा – प्रेयसी, काही वर्षांचं रिलेशनशिप अन् लग्न, समीर चौगुलेंनी लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त बायकोला दिलं खास सरप्राइज, म्हणाले…

नाटकप्रेमींना लक्षात घेत शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे. शिवाय या टी-शर्ट्सवर शांतता ठेवा नाटक सुरु आहे असे अनेक मॅसेज लिहिण्यात आले आहेत. शिवानी व विराजसच्या या नव्या व्यवसायाला त्यांचे चाहते तसेच सेलिब्रिटी मंडळी शुभेच्छा देत आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mrinal kulkarni son virajas and shivani rangole started new business share video on social media see details kmd