-
झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेमधील कलाकारांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसतात.
-
या मालिकेमध्ये अनामिका हे पात्र साकारणारी अभिनेत्री शिल्पा तुळसकरने तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
-
सध्या या मालिकेमधुळे ती चर्चेत आहे. शिल्पाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला.
-
शिल्पाचा प्रेमविवाह झाला आहे. तिने तिच्या अफेअरबाबत अमृता फिल्म्स या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं.
-
ती म्हणाली, “बऱ्यापैकी लहान वयामध्येच मी माझ्या नवऱ्याला भेटले होते. लग्न वगैरे करायचं का? असं त्यावेळा काही ठरलेलं नव्हतं.”
-
“तुला तुझ्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे? हे त्याने मला तेव्हा विचारलं होतं. तिथे मला थोडं वाटलं की हाच मुलगा माझ्याबरोबर आयुष्यभर असणार.”
-
“आमचा डेटींगचा काळ बऱ्यापैकी मोठा होता. २२ ते २५ वर्षांपूर्वी माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याबरोबरच लग्न केलं होतं. मीही माझ्या बॉयफ्रेंडबरोबरच लग्न केलं.”
-
शिल्पाने तिला एक व्यक्ती आवडत असल्याचंही यावेळी सांगितलं.
-
ती म्हणाली, “फिल्म इन्स्टीट्युटची डिप्लोमा फिल्म जेव्हा मी करत होते तेव्हा तिथला डीओपी मला खूप आवडला होता. त्याने चित्रीकरणादरम्यान लावलेली प्रत्येक फ्रेम छान दिसत होती.”
-
“त्या फ्रेमध्येच मी होते. मीही सुंदर दिसत होते. एक गोंधळ तेव्हा मी घातला. त्या डीओपीची व माझी छान मैत्री झाली होती.”
-
“मला कळलं होतं की त्याला मी आवडत आहे. मलाही तो आवडायचा. पण हे मी त्याला सांगितलं नाही. कारण मला बॉयफ्रेंड होता. मी कोणाला तरी डेट करत आहे हेही मी त्याला सांगितलं नाही.”
-
“पण शेवटी एक वेळ अशी आली की त्यानेच मला प्रपोज केलं. त्यावेळी माझा बॉयफ्रेंड आहे हे मला त्याला सांगावं लागलं. तेव्हा आमची मैत्री तुटली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही पुन्हा याच क्षेत्रात काम करत असताना भेटलो.”
-
“आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा खूप गंमतीने या विषयावर बोललो. पण मी त्याचं मन तेव्हा दुखावलं. आजही मला त्या गोष्टीचं दुःख वाटतं.”
-
शिल्पाने अगदी दिलखुलासपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलणं पसंत केलं. (सर्व फोटो – फेसबुक)

Devendra Fadnavis : “…तर हल्लेखोरांची संपत्ती जप्त करणार”, नागपूर दंगलीप्रकरणी फडणवीसांचा मोठा निर्णय