Big Bang Theory: माधुरी दीक्षितला “वेश्या” म्हणणाऱ्या अभिनेत्याला जया बच्चन यांनी सुनावलं, म्हणाल्या “त्याला..”

“ऐश्वर्या गरीबों की माधुरी” तर धक धक गर्लला “वेश्या” म्हणणाऱ्या नेटफ्लिक्सच्या शोवर जया बच्चन यांचा संताप, कुणाल नायरला दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

jaya bachchan slams bing bang theory actor
'बिग बँग थिअरी' मधील अभिनेत्याला जया बच्चन यांचा सडेतोड उत्तर. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नेटफ्लिक्सवरील ‘बिग बँग थिअरी’ हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नुकताच या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनच्या पहिल्याच भागात माधुरी दीक्षित व ऐश्वर्या रायबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

‘बिग बँग थिअरी’ प्रकरणावर आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री जया बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना जया बच्चन यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. जया बच्चन यांनी कुणाल नायरला स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. “हा कुणाल नायर पागल आहे का? त्याला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं पाहिजे. त्याने केलेल्या कमेंट ऐकून काय वाटलं, हे त्याच्या कुटुंबियांना विचारलं पाहिजे”, असं म्हणत जया बच्चन यांनी कुणाल नायरला सडेतोड उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>> “माझी मुलगी मुस्लीम धर्माचे पालन करते” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाची पोस्ट चर्चेत, म्हणाली “मी एक ब्राह्मण मुलगी…”

हेही वाचा>> ‘बिग बँग थिअरी’ शो मध्ये माधुरी दीक्षितविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप, नेटफ्लिक्सला नोटीस

नेमकं प्रकरण काय?

बिग बँग थिअरी या शोच्या पहिल्याच भागात माधुरी दीक्षित व ऐश्वर्या राय यांची तुलना करण्यात आली आहे. या शोमध्ये जिम पार्सन्सने साकारलेला शेल्ड कूपर ऐश्वर्याची माधुरीशी तुलना करत “गरीबों की माधुरी दीक्षित” असं म्हणतो. ऐश्वर्याबाबत केलेल्या य वक्तव्यामुळे कुणाल नायर नाराज होऊन “ऐश्वर्या राय देवीसारखी आहे” असं म्हणत माधुरीचा वेश्या म्हणून उल्लेख करतो. बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षित व ऐश्वर्या रायबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे या शोविरोधात राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी नेटफ्लिक्सला नोटीस पाठविली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 16:06 IST
Next Story
“ओटीटीचा त्रास…” ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या प्रदर्शनापूर्वी राणी मुखर्जीला करावा लागला मोठा सामना
Exit mobile version