पाकिस्तानी टिकटॉकर हरीम शाहचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया स्टार असलेल्या हरीम शाहचे बेडरुम व बाथरुममधील एमएमएस लीक झाले आहेत. मित्रांनीच खासगी व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप हरीमने केला आहे. या संपूर्ण प्रकरमावर हरीमचे पती बिलाल शाहने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिलाल शाह म्हणाला, “हरीमच्या मित्रांकडून ही अपेक्षा नव्हती. एका महिलेनेच दुसऱ्या स्त्रीचा असा व्हिडीओ व्हायरल केला आहे. हक्कांचं उल्लंघन करुन त्यांनी एका महिलेच्या चारित्र्यावर डाग लावला आहे. हरीमच्या मित्रांनी फार घाणेरडं कृत्य केलं आहे. पाकिस्तानात परतल्यावर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत”. “हरीमचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पत्नीला सोडून देण्याचा सल्ला मला अनेक जण देत आहेत. पण मी असं करणार नाही. आता तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. पत्नीच्या कठीण काळात तिच्याबरोबर खंबीर उभा राहणार नवरा खरा पुरुष असतो”, असंही बिलाल पुढे म्हणाला.

हेही वाचा>> पाकिस्तानातील प्रसिद्ध टिकटॉकरचा MMS झाला लीक, न्यूड व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया स्टार म्हणते…

हेही वाचा>> “भारतात लोकशाही संकटात आहे” राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याचा संताप, ट्वीट करत म्हणाला “निर्बुद्ध माणूस…”

“अशा कठीण परिस्थितीत मी हरीमला सोडून गेलो तर तो तिच्यावर अन्याय होईल. या सगळ्यासाठी मी फक्त अल्लाहला उत्तरे देण्यासाठी बांधील आहे. या प्रसंगात माझ्या पत्नीची साथ मी सोडणार नाही”, असं बिलाल पुढे म्हणाला. यावर हरीमने तिच्या भावना व्यक्त करत पतीचा माझ्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरीमने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या दोन मित्रांवर संशय व्यक्त केला आहे. संदाल खट्टक आणि आयेशा नाझ यांनी माझे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. “काही वर्षांपूर्वी मी स्वत: माझे हे व्हिडीओ बनवले होते. खट्टक आणि आयेशाने माझ्या फोनमधून हे व्हिडीओ चोरुन ते व्हायरल केले आहेत”, असं हरीम शाह म्हणाली आहे.

हेही वाचा>> पत्नी व मुलांना मध्यरात्री घराबाहेर काढल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी ट्वीटरवर ट्रेंड, भाऊ शमास फोटो शेअर करत म्हणाला…

हरीम शाह ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉकर व सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पाकिस्तानमधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारपैकी हरीम शाह एक आहे. तिचा चाहता वर्ग मोठा असून इन्स्टाग्रामवर हरीम शाहचे २ लाख ९६ हजार फॉलोवर्स आहेत. हरीम टिकटॉकवरही लोकप्रिय आहे. तिचे टिकटॉकवर १ लाख ८६ हजार फॉलोवर्स आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani tiktoker hareem shah nude video viral husband bilal shah said i will never leave my wife kak