‘झी मराठी’च्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रम सध्या चांगलाच रंगतदार होताना दिसत आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता फडणवीस, मेधा मांजरेकर या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे चार भाग प्रदर्शित झाले आहेत. आता येत्या भागात या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि त्यांची बहीण प्रीतम मुंडे सहभागी होणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झी मराठीने बस बाई बस कार्यक्रमाचा प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे. यात सुबोध भावे हे पंकजा मुंडे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधताना दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंनी विविध राजकीय घटना, पक्ष आणि इतर खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. यावेळी कार्यक्रमातील एका खेळादरम्यान पंकजा मुंडे यांना त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचा फोटो दाखवण्यात आला.

“एक एक आमदार की कीमत तुम क्या जानो…” सुबोध भावेंच्या प्रश्नांना पंकजा मुंडेंचे फिल्मी स्टाईल उत्तर

हा फोटो पाहताच त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुबोध भावेंनी पंकजा मुंडेंना तुम्हाला काय बोलायचे ते बोला, असे सांगितले. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, मी काहीही बोलू शकत नाही. मी त्यांच्याशी बोलतच नाही. कारण त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर टाकायला नको होतं.

दरम्यान या कार्यक्रमात पंकजा मुंडेंना सुबोध भावेने राजकीय स्थितीबद्दल एक प्रश्न विचारला. दुसऱ्या पक्षातील आमदार कधी फोडलेत का? असा प्रश्न सुबोध भावेंनी विचारला होता. त्यावर पंकजा मुंडेंनी फ्लिमी स्टाईलमध्ये उत्तर दिलं. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “एक एक आमदार की किंमत तुम क्या जानो सुबोध बाबू.”

“महाविद्यालयीन दिवसांची मजा घेताच आली नाही कारण…” पंकजा मुंडेंना आठवले जुने दिवस

पंकजा मुंडेंच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली. तर सुबोध भावे यांनी वाहवा असे म्हटले. त्यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde emotional after seeing gopinath munde photo in bus bai bus zee marathi programme nrp
First published on: 12-08-2022 at 08:00 IST