क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. आता आर्यननंतर अभिनेता चंकी पांडेची लेक अनन्या पांडेची चौकशी एनसीबी करत आहे. या सगळ्यात राखी सावंतने एनसीबीला एक विनंती केली आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ही विनंती केली आहे.

राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखी बोलते, “एनसीबीच्या लोकांना, हॅलो. तुम्ही काय करत आहात? दिवाळीआधीच तुम्ही दिवाळी साजरी करता, दिवाळीआधीच मोठे दिवाळीचे फटाके फोडत आहात, मोठे बॉम्ब फोडता. तुम्ही NCBवाले काय करत आहात, दया करा दया, बिचाऱ्यामुलांवर दया करा. ते आता मेहनत करत आहेत, अरे त्यांच्यावर दया कर. NCB वाल्यांसाठी आणखी काम आहेत, जगात इतर लोक आहेत जे अशी काम करतात, त्यांना पकडा ना. तुम्ही काय करता, तुम्ही दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी करत आहात. कुणी अशी दिवाळी साजरी करतं का, असं का करताय? अरे दया करा, मुलांवर दया करा.”

आणखी वाचा : तुरुंगाता आर्यन खानला प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या पुस्तकांचा आधार

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

ड्रग्स प्रकरणात एनसीबीची टीम सध्या अनन्याची चौकशी करत आहे. शुक्रवारी सकाळी अनन्याला ११ वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, ती जवळपास साडेतीन तास उशिरा आली. त्यावेळी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी अनन्याला फटकारलं आहे.

आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार

एवढंच नाही तर समीर वानखेडेंनी अनन्याला उशिरा येण्याचे कारण विचारले. त्यानंतर ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला ११ वाजता बोलवलं होते आणि तुम्ही आता येताय. अधिकारी तुमच्यासाठी बसलेले नाहीत. हे तुमचे प्रोडक्शन हाऊस नाही. हे एनसीबीचे मध्यवर्ती कार्यालय आहे. या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेत बोलावले जाईल, त्याच वेळेतच हजर राहा,” असे समीर वानखेडेंनी सांगितले.