झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ची ३ही पर्व तुफान गाजली. रात्रीस खेळ चाले ३ हि मालिका आता एका विलक्षण वळणावर आली असून आता मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अतृप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको ईंदू म्हणजेच माई घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. आता लवकरच नाईकांचा वाडा शापमुक्त होणार आहे.

आणखी वाचा- कंगनाला आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यास विवेक अग्निहोत्रींचा स्पष्ट नकार, म्हणाले…

नुकतंच मालिकेत पाहिलं की अण्णा वच्छीला सांगतात कि अण्णांनी मारलेली माणसं पण अतृप्त भूतं झाली आणि ती आता नाईकांचा बळी मागत आहेत. त्यावेळी वच्छी अण्णाला दोन पर्याय देते. मुक्ती किंवा शेवंता. पण शेवंता वाड्याबाहेरील अतृप्त भूतांना वाडा पेटवून द्यायला सांगते. तेव्हा वच्छी अण्णाला एक बळी द्यायचं कबूल करते.

आणखी वाचा- फोटोग्राफर्सना पोझ देताना समोर आलेल्या चिमुकल्यासोबत ‘अशी’ वागली मलायका, पाहा Viral Video

अण्णांच्या मागणीसाठी नाईकांच्या वाड्यावर घरातील बळी कोण जाणार याबद्दल भीती निर्माण होते. माई देवघरात जाऊन कुटुंबासाठी बळी जायला मी तयार असल्याचं सांगते. पण माई बळी जाण्यासाठी जाते तेव्हा तिच्यावर काळी सावली येते. हि काळी सावली कोणाची? हि सावली माईंचं रक्षण करणार कि घात? अतृप्त भुतांसाठी माईंचा बळी जाणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratris khel chale 3 new twist in serial in upcoming episode mrj