scorecardresearch

कंगनाला आपल्या चित्रपटासाठी साइन करण्यास विवेक अग्निहोत्रींचा स्पष्ट नकार, म्हणाले…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या यशानंतर बरेच कलाकार विवेक अग्निहोत्रींसोबत काम करण्यास उत्सुक आहेत.

vivek agnihotri, the kashmir files, kangana ranaut, the kashmir files collection, विवेक अग्निहोत्री, कंगना रणौत, द कश्मीर फाइल्स, कंगना रणौत इन्स्टाग्राम, विवेक अग्निहोत्री प्रतिक्रिया
'द कश्मीर फाइल्स'नंतर अभिनेत्री कंगना रणौत लवकरच विवेक अग्निहोत्रींसोबत काम करणार असल्याच्या चर्चा देखील होत्या.

काश्मिर खोऱ्यात ३२ वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या याची कथा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं तुफान कमाई केली. एवढंच नाही तर अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि प्रभासचा ‘राधे श्याम’ या चित्रपटांनाही चांगलीच टक्कर दिली. या चित्रपटाच्या यशानंतर बरेच कलाकार दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.

‘द कश्मीर फाइल्स’नंतर अभिनेत्री कंगना रणौत लवकरच विवेक अग्निहोत्रींसोबत काम करणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. मात्र विवेक अग्निहोत्रींनी कंगनासोबत कोणताही चित्रपट अद्याप साइन केलेला नाही. एवढंच नाही तर कंगनासोबत काम करण्याबाबत त्यांना विचारणा झाल्यावर त्यांनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला.

आणखी वाचा- फोटोग्राफर्सना पोझ देताना समोर आलेल्या चिमुकल्यासोबत ‘अशी’ वागली मलायका, पाहा Viral Video

एका मुलाखतीत त्यांना, ‘अभिनेत्री कंगनासोबत भविष्यात काम करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘मला कोणत्याही स्टारची गरज नाहीये मला फक्त एक कलाकार हवाय जो उत्तम अभिनय करू शकेल. जेव्हा मी १२ वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारासोबत काम करणं मला आवडतं.’

आणखी वाचा- रणबीर- आलियाच्या लग्नाबाबत नीतू कपूर यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

दरम्यान सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. एकीकडे त्यांच्या चित्रपटाचं कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे काही लोकांकडून या चित्रपटाला विरोधही होताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या कामाबद्दल बोलायचं तर ते सध्या ‘दिल्ली फाइल्स’ चित्रपटाची तयारी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vivek agnihotri refuse to work with star actor like kangana ranaut