हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री सेलेना गोमेझ नेहमीच चर्चेत असते. जगभरात सेलेनाचे करोडो चाहते आहेत. भारतातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर सेलेना मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. व्हि़डीओ आणि फोटो शेअर करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र, सध्या सेलेना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सेलेनाने सोशल मीडियातून ब्रेक घेतला आहे. या अभिनेत्रीनं आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत ही माहिती दिली आहे. सेलेनच्या या निर्णयानं अनेकांना धक्का बसला आहे. सेलेनानं आपल्या पोस्टमधून अचानक एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं कारणही सांगितलं आहे.

हेही वाचा- “लोक इतके अमानवी अन्…”, दीपिका पदुकोणला ट्रोल करणाऱ्यांवर संतापल्या काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत; म्हणाल्या, “स्वतःच्या आयुष्यात…”

सेलेनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे “मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. कारण- जगात सुरू असलेली दहशत, द्वेष, हिंसा व दहशत पाहून माझे हृदय तुटत आहे. लोकांचा छळ आणि हत्या किंवा कोणत्याही एका समूहाप्रती द्वेष हे कृत्य भीतीदायक आहे. आपण सर्व लोकांचं, विशेषत: लहान मुलांचे रक्षण केलं पाहिजे. हा हिंसाचार एकदाचा थांबवावा.”

सेलेनानं पुढे लिहिलंय, “माझे शब्द प्रत्येकासाठी किंवा हॅशटॅगसाठी कधीही पुरेसे नसल्यास मला माफ करा. निष्पाप लोकांना दुखापत होताना पाहणं मला सहन होत नाही आहे. याचा मला खूप त्रास होत आहे. त्यामुळे मी आजारी पडत आहे. मी हे जग बदलू शकली असते तर … पण एक पोस्ट असं करू शकत नाही. लव्ह, सेलेना.”

हेही वाचा- कार्तिक आर्यन काँग्रेसमध्ये? प्रचार करणारी ‘ती’ जाहिरात व्हायरल; अभिनेता स्पष्टीकरण देत म्हणाला…

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सेलेनानं हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. सेलेनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selena gomez taking social media break said my heart breaks to see violence and terror dpj