छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून आई कुठे काय करते या मालिकेला ओळखले जाते. या मालिकेत गौरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गौरीने अंगठी घालून हाताचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन तिने गुपचूप साखरपुडा केला, अशा चर्चांना उधाण आले होते. अखेरी गौरी कुलकर्णीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
गौरी कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. गौरीने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबरला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिच्या बोटातील नवीकोरी हिऱ्याची अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. “Its Happening” असं कॅप्शन गौरीने या फोटोला दिले होते. यानंतर गौरीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती.
आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”
आता अखेर या चर्चांवर गौरीने स्पष्टीकरण दिले आहे. मी साखरपुडा केलेला नाही. मी माझ्या नव्या बिजनेसची जाहिरात करण्यासाठी ती पोस्ट केली होती. गौरीने स्वतःचा नेल आर्टचा ब्रँड सुरू केला आहे. ‘नखरेल नेल्स’ असे तिच्या या नव्या ब्रँडचे नाव आहे. तिने पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “हो मी एन्गेज आहे, एका खास गोष्टीशी. मी माझ्या नव्या ब्रँडशी एन्गेज आहे. ‘नखरेल नेल्स’. ‘नखरेल नेल्स’ या माझ्या बाळाची मी खूप दिवसांपासून प्लॅनिंग करत होते आणि आता ते तुमच्यासाठी तुमच्या समोर सादर करत आहे. PS- मी जेव्हा खरंच engagement करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्कीच सांगेन!”
आणखी वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष
“माझ्या शेवटच्या पोस्टला तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिलात, त्यासाठी धन्यवाद. तुम्ही त्या पोस्टबद्दल जाणून घेण्यासाठी जितके उत्सुक आहात, तितकीच मी पण तुम्हाला त्याबद्दल सांगण्यास उत्सुक आहे. मी कोणामध्ये तरी गुंतलेली नसून एका गोष्टीमध्ये गुंतलेली आहे. गेल्या काही वर्षांपासून माझं जे स्वप्न होतं ते अखेर पूर्ण होतंय. मी माझा स्वत:चा ब्रँड लाँच करतेय. नखरेल नेल्स असे याचे नाव आहे. नखरेल नेल्स हा एक प्रेस ऑन नेल ब्रँड आहे. आतापर्यंत एक अभिनेत्री म्हणून तुम्ही माझ्यावर भरभरुन प्रेम केलं, तसंच आता तुम्ही माझ्या ब्रँडवरही भरभरुन प्रेम कराल, अशी माझी अपेक्षा आहे”, असे गौरीने या व्हिडीओत म्हटले आहे.
दरम्यान गौरी कुलकर्णीच्या या पोस्टनंतर तिचे चाहते कमेंट करत तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तिच्या अनेक सहकलाकारांनी तिला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.