अनेक कलाकार त्यांच्या अभिनयासाठी कमी आणि कॉन्ट्रोव्हर्सीसाठी जास्त ओळखले जातात. यातलंच एक नाव म्हणजे अर्शी खान होय. अर्शी खान ‘बिग बॉस ११’ मध्ये स्पर्धक म्हणून आणि ‘बिग बॉस १४’ मध्ये चॅलेंजर म्हणून पोहोचली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिने केलेली वक्तव्ये चांगलीच चर्चेत होती. त्यापैकी एक वक्तव्य तिने तिच्या आजोबांबद्दल केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तुमचे अज्ञान आणि आंधळेपणा…” परदेशी माध्यमांनी दीपिका पदुकोणची ओळख चुकीची सांगितल्याने नेटकऱ्यांचा संताप

अर्शीने बिग बॉसच्या घरात असताना अनेक विधानं केली होती. त्यातली बरीच विधानं खोटी होती. अर्शीने तिचे आजोबा चरित्र्यहीन असल्याचं नॅशनल टेलिव्हिजनवर म्हटलं होतं. तिचे आजोबा मुळचे अफगाणिस्तानमधले होते. आपले आजोबा चरित्र्यहीन होते, त्यांनी१८ लग्ने केली होती आणि त्यांची १२ मुलं होती, असं अर्शी खान म्हणाली होती.

अर्शीच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. तिच्या आईने ती खोटं बोलत असल्याचंही म्हटलं होतं. यानंतर अर्शी खानचे पालक संतापले होते. कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी अर्शीच्या वडिलांना मीडियासमोर यावे लागलं आणि स्पष्टीकरण द्यावं लागलं. जेव्हा आपल्या वडिलांचे निधन झाले तेव्हा अर्शी फक्त चार वर्षांची होती. आपल्यालाही स्वतःच्या वडिलांबद्दल फार कमी माहिती आहे, मग अर्शीला कशी माहिती असेल, असं अर्शीच्या वडिलांनी म्हटलं होतं.

मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…

अर्शीचे आजोबा अफगाणिस्तानचे नव्हते. तसेच त्यांनी १८ लग्नही केली नाहीत. अर्शीच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या बाबांची फक्त दोन लग्ने झाली होती आणि इंग्रजांच्या काळात ते भोपाळ सेंट्रल जेलचे जेलर होते. आजोबांनी १८ लग्न केली या अर्शीच्या म्हणण्यावर तिची आई म्हणाली होती की, अर्शी पब्लिसिटीसाठी काहीही करु शकते. ती माध्यमांचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी कुटुंबाचे नावही बदनाम करु शकते. ती प्रसिद्ध होण्यासाठी कितीही खोटं बोलू शकते असे तिची आई म्हणाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshi khan once said her grandfather married 18 times and had 12 children hrc