बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या ऑस्कर २०२३ला हजेरी लावली. या कार्यक्रमात दीपिका प्रेझेंटर म्हणून पोहोचली होती. भारताला यंदाच्या सोहळ्यात दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. एकंदरीतच अवॉर्ड आणि दीपिकाच्या हजेरीमुळे यंदाचा ऑस्कर सोहळा भारतात चर्चेत राहिला.

‘मणिकर्णिका’नंतर अंकिता लोखंडेला मिळत नाहीये बॉलिवूडमध्ये काम; कारणांचा खुलासा करत म्हणाली…

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’

१३ मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणची ओळख चुकीची सांगण्यात आली. यावेळी परदेशी मीडिया चॅनलने तिची ओळख हॉलिवूड मॉडेल कॅमिला अॅल्वेस म्हणून सांगितली. परदेशी मीडियाच्या या माहितीवर दीपिकाचे चाहते संतापले आणि त्यांनी ट्विटर त्यांना चांगलंच सुनावलं आहे.

मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…

दीपिकाचे फोटो शेअर करत तिची ओळख कॅमिला अॅल्वेस अशी सांगितली गेली. कॅमिला ही ब्राझीलची मॉडेल आहे. “दीपिका स्वतः आंतरराष्ट्रीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. असं असूनही परदेशी मीडिया तिला ओळखत नाही, हा निव्वळ वर्णद्वेष आणि मीडिया चॅनलचा निष्काळजीपणा आहे,” असं ट्वीट एका युजरने केलंय.

दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “ही दीपिका पदुकोण आहे. पण ती कॅमिला अॅल्वेस असल्याचा तुम्हाला गैरसमज झाला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की दीपिका खूप प्रसिद्ध आहे. तिचे ७२ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि तिने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.”

“ही आहे दीपिका पदुकोण. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री. यातून तुमचे अज्ञान आणि आंधळेपणा दिसून येत आहे. कृपया ते सुधारा,” असं एका युजरने लिहिलं आहे.

दीपिकाने २०२३च्या ऑस्कर कार्पेटवर लुई व्हिटॉन क्लासिक ऑफ-शोल्डर गाउनमध्ये हजेरी लावली. तिच्या ब्लॅक ड्रेस आणि सौंदर्याचं खूप कौतुक झालं. यावेळी दीपिका खूप आत्मविश्वासाने स्टेजवर पोहोचली आणि तिथे ‘आरआरआर’चे ‘नाटू-नाटू’ गाणे प्रेझेंट केले होते.